शिंदे गटाकडून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची नावे चर्चेत आहेत.
ओरोस : लोकसभेचा (Loksabha Election) रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपचाच आहे. तो भाजपच लढविणार. पक्ष देईल तोच उमेदवार निवडून आणला जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी येथे दिली.
सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमावेळी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळणार की भाजपला (BJP) यावरून सध्या राजकीय चढाओढ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री. राणे यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
शिंदे गट आणि भाजप यांची लोकसभेसाठी युती असणार हे उघड आहे. पूर्वीच्या युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. सध्या येथील खासदार विनायक राऊत शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये आहेत. नव्याने झालेल्या भाजप-शिंदे गट युतीत दोघांनीही या जागेवर दावा केला आहे. शिंदे गटाकडून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची नावे चर्चेत आहेत.
केसरकर यांनी अप्रत्यक्षरित्या इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे किरण सामंत यांनी उघडपणे उमेदवारीसाठी दावा केला नसला तरी त्यांचा गेल्या काही दिवसांमध्ये मतदारसंघात वाढलेला संपर्क बरेच काही सांगून जाणारा आहे. किरण सामंत उद्योजक असले तरी उदय सामंत यांच्या राजकारणात त्यांची पडद्यामागची भूमिका कायमच महत्त्वाची राहिली आहे. अलीकडे त्यांचा चेहरा राजकीय पटलावरही दिसू लागला आहे.
पूर्ण मतदारसंघात त्यांचे बॅनर लागल्याचेही चित्र आहे. मध्यंतरी काही काळासाठी किरण सामंत यांनी सोशल मीडियावर ठाकरे गटाचे ‘मशाल’ हे चिन्ह ‘स्टेटस’ म्हणून ठेवल्याने खळबळ उडाली होती. इकडे भाजपही या जागेवर दावा करत आहे. माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह काही नेत्यांची उमेदवारीसाठी नावे चर्चेत आहेत. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास नारायण राणे हेही निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार नीतेश राणे यांनी ‘किरण सामंत यांना लोकसभा लढवायची असल्यास उदय सामंत यांनी त्यांना भाजपमध्ये पाठवावे,’ असे वक्तव्य केले होते. यातच आज नारायण राणे यांनी भाजपचाच उमेदवार असेल, असे केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. ते म्हणाले, ‘‘या मतदारसंघात भाजपच आपला उमेदवार देणार आहे. पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे तो निवडून आणू, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग चिपळूणपासून दोडामार्गपर्यंत पसरलेला मतदारसंघ आहे. येथे उमेदवार नवखा देऊन चालणार नाही. या पार्श्वभूमीवर भाजपकडून नारायण राणेंना लोकसभा लढविण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक लढविणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘हा माझा प्रश्न नाही. उमेदवारी कोणाला द्यायची, हे पक्ष ठरवेल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.