कोकण

आव्हाडांविरोधात वेंगुर्लेत भाजपचे जोड़ेमारो आंदोलन

CD

86890

आव्हाडांविरोधात वेंगुर्लेत
भाजपचे जोडेमारो आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३०ः महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून त्यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वेंगुर्ले भाजपच्यावतीने आज जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आव्हाड यांचा निषेध करण्यात आला.
शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट केल्याच्या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही छायाचित्र फाडले गेले. या घटनेच्या निषेधार्थ आज गुरुवारी वेंगुर्ले-आनंदवाडी समाजमंदिर येथे भाजपच्या वतीने जोडेमारो आंदोलन करून आव्हाड यांचा निषेध करण्यात आला.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, दादा केळुसकर, वसंत तांडेल, पप्पू परब, ज्ञानेश्वर केळजी, प्रशांत खानोलकर, वृंदा गवंडळकर, प्रशांत खानोलकर, युवराज जाधव, आर. के. जाधव, विशाखा जाधव, मयुरेश जाधव, अर्जुन मठकर, दीपक जाधव आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: निकाल त्यांच्या बाजूने लागत नाही तेव्हा... निवडणूक जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, काय म्हणाले?

Mumbai News: मुंबई हादरली! भाजप माजी खासदाराच्या पुतण्याने संपवलं जीवन, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी

Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Chennai Flood : चेन्नईला पावसाने झोडपले! शाळा महाविद्यालयांना सुटी; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

SCROLL FOR NEXT