चिपळूण (रत्नागिरी): कोरोनातून (Covid 19) झालेल्या रुग्णांच्या साखरेची पातळी अनियंत्रित असल्यास म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis)आजार बळावण्याची शक्यता आहे. काळी बुरशी(Black fungus)असे वर्णन केले गेलेल्या या आजाराचा धसका अनेकांनी घेतल्याचे आता दिसू लागले आहे. चिपळुणातील कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या (Ear-nose-throat specialist)दवाखान्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अधिक रुग्ण तपासणीसाठी येऊ लागले आहेत.(Black-fungus-fear-ear-nose-throat-hospital-Crowd-of-patients-in-chiplun-ratnagiri)
म्युकरमायकोसिसच्या भीतीपोटी कान-नाक-घसातज्ज्ञ डॉक्टरांकडे लोक तपासणीसाठी जात असून, आपल्या शंकांचे निरसन करत आहेत. अनेकजण चेहऱ्यावर काळा डाग पडला तरीही घाबरू लागले आहेत. कामथे येथील जिल्हा उपरुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका कोरोनाग्रस्ताला म्युकरमायकोसिसचा आजार झाला होता. उपचारादरम्यान त्याचे निधन झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रत्नागिरी जिल्हा सुरक्षित होता. काही दिवसानंतर शृंगारतळी येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता; मात्र म्युकरमायकोसिस आजार पसरल्यानंतर काही दिवसांतच चिपळुणात या आजाराचा रुग्ण आढळळा. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिक भीती आहे.
ग्लुकोमीटरने साखरेची पातळी तपासा
याबाबत माहिती देताना डॉ. दीपाली चव्हाण म्हणाल्या, जर एखाद्याची साखर नियंत्रणात असेल तर त्यांना म्युकरमायकोसिसचा धोका नाही. नागरिकांनी ज्याप्रमाणे प्राणवायूच्या तपासणीसाठी ऑक्सिमीटर खरेदी केले आहेत, त्याप्रमाणे साखरेच्या तपासणीसाठी ग्लुकोमीटर विकत घेऊन दररोज घरामध्ये साखरेची पातळी तपासणे गरजेचे आहे.
तत्काळ तपासणी करा
ज्या व्यक्तींना कोरोना झाला होता, त्यांनी कोरोनाची लक्षणे दिसल्यापासून १०० दिवसांच्या आत नाक-डोळे-दाताचा त्रास झाल्यास, तत्काळ तपासणी करून घ्यावी. काळजी घेणे उत्तमच, परंतु अनेकांना भीतीने ग्रासले आहे, असे निरीक्षणही डॉ. दीपाली चव्हाण यांनी नोंदविले.
तपासणीशिवाय समाधान नाही
सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जास्त आहे. डॉक्टर माझे डोळे दुखत आहेत. कानात काही तरी टोचल्यासारखे होतेय. मला नव्या आजाराने तर ग्रासले नाही ना? डॉक्टर दात दुखतोय, डोळे लाल होत आहेत. म्युकर तर नाही ना? अशा तक्रारी घेऊन शहरातील नागरिक डॉक्टरांकडे येत आहेत. काहीजणांना तपासणी केल्याशिवाय समाधान मिळत नाही. त्यामुळे डोळ्यांच्या तपासणीसाठी गर्दी वाढू लागल्याचे कान-नाक-घसातज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.