बातमी समजताच पंचक्रोशीतून अनेक नागरीकांनी उत्सुकतेने पाहण्यासाठी दाभोलकर यांच्या घरी गर्दी केली.
मंडणगड : तालुक्यातील तिडे कुंभारवाडी येथील अश्विनी अर्जुन दाभोळकर यांच्या घरातील कोंबडीने चार पायांच्या पिल्लाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. (mandangad) आश्चर्य म्हणजे हे पिल्लू चांगले गुटगुटीत आणि तंदुरुस्त असून पुढील दोन पायांवर फिरत आहे. (konkan news) ही बातमी समजताच पंचक्रोशीतून अनेक नागरीकांनी उत्सुकतेने पाहण्यासाठी दाभोलकर यांच्या घरी गर्दी केली. (four leg hen baby)
ही नवलकारक घटना समजल्यानंतर तिडे येथे जावून पिल्लाला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक भेट देत आहेत. अंडी उबवण्यासाठी रवणावर ठेवण्यात आलेल्या कबऱ्या रंगाची कोंबडीने एकवीस दिवसानंतर (२५) सप्टेंबर रोजी पाच पिल्लांना जन्म दिला. सकाळी अश्विनी दाभोळकर या पाहण्यासाठी गेल्या असता त्यांना चार पायांचे पिल्लू आढळून आले. प्रथम त्यांना दोन पिल्लं असल्याचे वाटले. मात्र नीट निरीक्षण केले असता एकाच पिल्लाला चार पाय असल्याचे निदर्शनात आले. त्यांनी ही गोष्ट घरातील मंडळींना सांगितली. हे पांढरट कबऱ्या रंगाचे पिल्लू असून त्याला शेपटीकडील बाजूकडे आणखी दोन पाय आहेत. तसेच पायाला तीन तीन नख्याही आहेत. हे पिल्लू चालताना पुढील दोन पायांवर चालत असून मागील पायांचा वापर करत नाही. कोंबडीच्या पिल्लाला चार पाय असण्याची ही जिल्ह्यातील पहिली घटना असल्याचे सांगण्यात येत असून ज्यांना हे ऐकायला आणि पहायला मिळत आहे त्यांना नवलच वाटत आहे.
"जन्मावेळी जेनेटिक बिघाडमुळे असे घडू शकते. याला polymelia म्हणतात. याची कारणे म्हणजे टेरैटोजेनिक, वातावरणातील दोषामुळे किंवा आनुवंशिक दोष असणे. यामध्ये एकाच गर्भात एक पेक्षा जास्त जीव वाढत असतात परंतू chromosomal defect मुळे दुसरा जीव नष्ट होतो व त्याचे काही अवयव येतात. उदा. पाय, हात तसेच जुळ्या जीवासोबत येत असतात. यांना आपण म्यूटंट सुद्धा म्हणू शकतो."
- डॉ. आर. एस. जायभाये, पशुवैद्यकीय अधिकारी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.