crime news esakal
कोकण

दाढी करुन येतो म्हणून नवरदेवाने लग्नमंडपातून पळ काढला.. मग अडकला कायद्याच्या कचाट्यात

लग्नघटिका समीप आली असताना दाढी करून येतो, असे सांगत लग्नमंडपातून नवरदेवाने पळ काढल्याचा प्रकार महाडमध्ये घडला.

सकाळ वृत्तसेवा

महाड : लग्नघटिका समीप आली असताना दाढी करून येतो, असे सांगत लग्नमंडपातून नवरदेवाने पळ काढल्याचा प्रकार महाडमध्ये घडला. याप्रकरणी वधूच्या तक्रारीनंतर मंगळवारी नवरदेवाविरोधात लग्नाच्या भूलथापा देत अत्याचार केल्याचा गुन्हा महाड तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले रायगड परिसरातील एका गावातील २३ वर्षीय तरुणीचे गावातील प्रदीप वसंत बोराणे (वय २३) याच्याशी प्रेमसंबंध होते. या दोघांच्याही नातेवाईकांनी त्यांच्या विवाहास संमती दिली होती.

त्यानुसार २७ डिसेंबर २०२३ रोजी महाडमधील एका मंदिरात त्यांचे लग्न लावण्यात येणार होते. त्यानुसार दोन्हीकडील नातलग लग्नकार्यासाठी जमले होते. विवाह लावण्याची तयारी सुरू असतानाच नवरदेव प्रदीप याने दाढी करून येतो असे सांगून तेथून पोबारा केला.

बराच वेळ वाट पाहून सर्वांनी शोध घेऊनही नवरदेवाचा काहीही थांगपत्ता न लागल्याने अखेर वधूने त्याच्याविरोधात महाड तालुका पोलिस ठाण्यामध्ये लग्नाच्या भूलथापा देत अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनंतर फरार प्रदीपवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक एस. बी. अवसरमोल करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: डेव्हिड वॉर्नर सोडा, १९ वर्षांचा ओपनर टीम इंडियाला घाम फोडणार! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑसी कोचचे संकेत

MNS Candidates List: मनसेची सहावी यादी जाहीर, ३२ उमेदवारांची नावे, कुणाला मिळाली संधी?

Latest Maharashtra News Updates Live : धौला कुआनजवळ डीटीसी इलेक्ट्रिक बसला आग

Bandra Terminus चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! Platform Ticket ची विक्री बंद, पण किती दिवसांसाठी? जाणून घ्या

Assembly Elections: उमेदवारी अर्जासाठी 2 दिवस शिल्लक, जाणून घ्या आतापर्यंत महायुती-मविआने किती उमेदवार जाहीर केलेत?

SCROLL FOR NEXT