कोकण

असली नोकरी काय कामाची?

अमोल टेंबकर

सावंतवाडी - बीएसएनएल प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्यामुळे कंत्राटी कामगारांवर एखादा प्रसंग कोसळल्यास त्याला कसे वाऱ्यावर सोडले जाते, याचा प्रत्यय असनिये येथील बीएसएनएलचे कंत्राटी कामगार संतोष सावंत यांना सध्या येतोय. एका अपघातात त्यांच्या मुलाला गंभीर इजा झाली; मात्र गेले दहा महिने पगार नसल्यामुळे त्यांना मुलाच्या उपचारासाठी लोकांकडे याचना करावी लागत आहे.

याबाबतची माहिती काही बीएसएनएलच्या ग्राहकांकडून देण्यात आली. श्री. सावंत यांच्यावर आलेली परिस्थिती अन्य कोणावर येऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. यासाठी आता बीएसएनएल प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी आणि त्या कुटुंबाला सावरावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. असनियेत काम करणाऱ्या सावंत यांचा मुलगा गीतेश हा गेल्या आठवड्यात सायकलवरून जाताना पडला. यावेळी सायकलचा बॅलन्स थेट त्याच्या बरगड्या वर आदळल्याने त्याच्या हृदयाला दुखापत झाली. त्याच्यावर सध्या गोवा बांबोळी येथे उपचार सुरू आहेत.  त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय येथील वैद्यकीय अधिकारी घेतला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तब्बल तीन वर्षे त्याला बेडरेस्ट घ्यावी लागणार आहे.

या सर्व परिस्थितीत बीएसएनएलचे कंत्राटी कामगार असलेले त्याचे वडील संतोष सावंत यांना दहा महिने पगार नाही. त्यामुळे आता मुलाच्या उपचाराचा खर्च कसा करावा हा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. शस्त्रक्रीयेसाठीचा खर्च त्यांनी कसाबसा उभा केला; पण पुढे काय हा प्रश्‍न त्यांना सतावत आहे.
अधिक माहिती घेतली असता प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात समन्वय नसल्यामुळे अनेकवेळा कंत्राटी कामगार कामगारांचे पगार वेळेत होत नाहीत.  अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता आपण ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. त्यांनी बिले अदा केल्यानंतर पुढील भूमिका घेतली जाईल, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawr : रोहित तू थोडक्यात वाचलास.. वाकून नमस्कार करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांचा मिश्किल टोला

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजयी आमदारांची आज बैठक

Share Market Today: शेअर बाजारातील ट्रेंडमध्ये झाला बदल; आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

SCROLL FOR NEXT