business 9 thousand rupees for first two dozen boxes of Alphonso Hapus mango kokan  esakal
कोकण

Alphonso Mango : हापूसच्या पहिल्या दोन डझन पेटीला 9 हजार रुपये दर

सकाळ वृत्तसेवा

देवगड : कातवण (ता. देवगड) येथून वाशी फळबाजारात गेलेल्या पहिल्या दोन डझन आंबा पेटीला ९ हजार रुपये दर मिळाला. कातवण येथील दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूसची पहिली दोन डझनची पेटी फळबाजारात पाठवली होती.आंबा बागायतदार दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे यांच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना १५ ऑगस्टच्या आसपास मोहोर येण्यास सुरवात झाली होती. प्रयोग म्हणून आलेला मोहोर टिकवण्यासाठी शिंदे बंधूंनी खूप मेहनत घेतली.

मोहोराची काळजी घेतल्याने त्यातून उत्तम फलधारणा झाली. त्यामुळेच चार कलमांवरील उत्पादित झालेल्या आंब्याचे पहिले फळ काढून ‘देवगड हापूस’ची पहिली पेटी विधिवत पूजा करून वाशी फळबाजारात पाठविण्यात आली होती. वाशी फळबाजारातील आंबा व्यापारी अशोक हांडे यांच्याकडे आंबा पेटी पाठविण्यात आली होती. पहिल्या दोन डझन पेटीला ९ हजार रुपये दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND Vs New Zealand Test: भारतीय संघाची घोषणा; बुमराहची मोठी झेप! उप कर्णधारपदाची माळ पडली गळ्यात

Video: सत्तेला धरा, हीच विचारधारा!; सयाजी शिंदेंचं जुनं रिल अन् मिम्स व्हायरल

Latest Marathi News Updates: दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या सविस्तर

Sayaji Shinde NCP: "मी अनेक नेत्यांच्या भूमिका केल्या पण..."; राष्ट्रवादीत प्रवेशानंतर सयाजी शिंदेंनी मांडली भूमिका

IND vs NZ: भारताविरूद्ध घेणार आक्रमक पवित्रा; न्यूझीलंडच्या कर्णधाराने सांगितली रणनीती

SCROLL FOR NEXT