शिवसेना शहर शाखाप्रमुख प्रसाद रेळेकर यांनी दापोली पोलिस (Dapoli Police) ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली.
दाभोळ : दापोली शहरात आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांच्या दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांची तोडफोड करून नुकसान केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबरला दापोली शहरातील स्वा. सावरकर चौक, आसऱ्याच्या पुलावर आमदार योगेश कदम यांचे दिवाळी शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले होते. ते १५ नोव्हेंबरला रात्री अज्ञाताने फाडले होते. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्या रात्री संतोष बिडकर व त्यांच्यासोबत २ अनोळखी यांनी हे फलक ओढून त्याची तोडफोड करून नुकसान करत असल्याचे आढळून आले.
त्यानंतर शिवसेना शहर शाखाप्रमुख प्रसाद रेळेकर यांनी दापोली पोलिस (Dapoli Police) ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली. त्यानंतर संशयित संतोष बिडकर व दोघा अज्ञातांविरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास राजेंद्र नलवडे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.