kokan 
कोकण

अन् त्याने मंदितही शोधली संधी; रोज मिळवतोय तब्बल एवढे पैसे

संदेश पटवर्धन

आरवली (सिंधुदुर्ग) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे व्यवसाय नष्ट  झाले. आजपर्यंत गाठीला बांधलेली व साठवलेली आर्थिक पुंजी संपल्याने भविष्याच्या चिंतेने ग्रासले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे (चांदीवडेवाडी) येथील चंद्रकांत रत्ना चांदीवडे हा तरुण मात्र त्याला अपवाद आहे. त्याने मंदीतही संधी शोधून खाण्याच्या पानाचा व्यवसाय शोधला आहे. त्यातून त्याने आपली आर्थिक समस्या सोडवून संसाराची घडी बसविण्याचा प्रयत्न केला आहे.

चंद्रकांत रोज सकाळी पहाटे सहा वाजता डोक्यावर खाण्याच्या पानांची करंडी घेतो. गावच्या बारा वाड्यापैकी रोज चार वाड्या प्रत्येक घरी पायी चालत जाऊन पाने विकतो. दुपारी एकच्या सुमारास घरी परततो. त्याच्या सात तासाच्या या व्यवसायात दोन हजार पान विक्री करून त्याला दररोज चारशे ते पाचशे रुपये मिळतात. सांयकाळीही मागणीप्रमाणे तो लोकांना पानाबरोबर जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचे काम करतो. गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या संधी आहेत. त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास व लाज न बाळगता केल्यास आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल, असे चंद्रकांतचे म्हणणे आहे.

चंद्रकांत म्हणाला, लॉकडाउनपूर्वी मुंबईत मिळेल ते काम केले. पेंटिंगचे काम मिळाले. मात्र त्यामध्येही नियमितता नसल्याने मंडप बांधणीमध्ये स्वतःला झोकून देत काम केले. यातूनच पुढे मात्र कोकणचा सांस्कृतिक ठेवा फिरता बहुरंगी 'नमन’ या कला प्रकारामध्ये ’मेकअपमन’ म्हणून काम मिळाले. गावी पुरेशी शेती आहे. त्यातून कुटुंबाला पुरेल एवढे उत्पन्न मिळत नाही. लॉकडाउनमध्ये गावी आल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी लोकांची गरज ओळखून त्याने पान विक्रीचा व्यवसाय निवडला. सकाळी वाडीमध्ये जाताच पानवाले.... आले, पाने.... घ्या ......पाने..? अशी आरोळी मारताच पुरुषांबरोबर महिलाही पाने घेण्यासाठी बाहेर येतात. चुना, सुपारीची दारातच सोय होत असल्याने चंद्रकांत यांची लोक आता आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. तसेच महिला लिंब, अगरबत्ती, धूप, कापूर आदी वस्तूंची मागणी करत आहेत. त्याने या वस्तूही सोबत ठेवल्याने महिलांची सोय झाली आहे. सकाळपासून दुपारी एकपर्यंत दोन हजार पानांची विक्री होत असल्याने पुढचा वेळ घरी व इतर कामाला मिळत आहे. 

करजुवे येथील चंद्रकांत चांदिवडे म्हणाले, पहाटे कोल्हापूरहून आरवली येथे येणारी पाने घरी आणल्यावर ती स्वच्छ करून धुवून नीट ठेवण्यासाठी पत्नी स्वाती व मुले स्नेहा, सिमरन व मुलगा श्रवण मदत करतात. कुटुंबाचे चांगले सहकार्य मिळत असल्यानेच हे काम करण्यास आनंद मिळतो. भविष्यात पानाबरोबर भाजीविक्री करण्याचा मानस आहे.


संपादन : सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Uddhav Thackeray: सरकार कुणी पाडलं, राज ठाकरेंबरोबर जाणार का? उद्धव ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT