Raigad Irshalwadi esakal
कोकण

Chiplun Flood : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर; 36 वाड्यांना स्थलांतराच्या नोटिसा, 18 पथकं तैनात

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी-ठाकूरवाडी (Raigad Irshalwadi) आदिवासी पाड्यावर डोंगर कोसळल्याने अनेकांचे जीव गेले.

सकाळ डिजिटल टीम

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील आदिवासी पाड्यात डोंगर कोसळून अनेक कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची घटना घडली.

चिपळूण : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी-ठाकूरवाडी (Raigad Irshalwadi) आदिवासी पाड्यावर डोंगर कोसळल्याने अनेकांचे जीव गेले. अजूनही अनेक कुटुंबे दरडीखाली गाडली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

तालुक्यात दरडीचा (landslide) धोका असलेल्या १३ ग्रामपंचायत (Gram Panchayat) परिसरातील ३६ वाड्यांमधील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा पुन्हा एकदा बजावल्या आहेत. येथील लोकांचे तात्पुरते पुनर्वसन होण्यासाठी ग्रामीण भागात २६ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत.

दरडग्रस्त भागात लक्ष ठेवण्यासाठी १८ नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून १८ पथके तयार केली आहेत. दोन दिवसांपूर्वी तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्याचा शहरी व ग्रामीण भागातही काहीअंशी फटका बसला. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी डोंगराला भेगा पडल्या असून काही गावांमध्ये यापूर्वी पडलेल्या भेगादेखील रूंदावल्या आहेत.

नांदिवसे राधानगर, कोळकेवाडी, तिवडी, तिवरे, कादवड आदी गावांमध्ये गतवर्षीच डोंगराला भेगा पडल्या होत्या; मात्र आता या भेगांचे प्रमाण आणखी वाढले आहे. या गावांतील ग्रामस्थांना जूनअखेरला प्रशासनाने स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या होत्या; मात्र त्यानंतरही ग्रामस्थांनी गाव सोडले नाही. अजूनही त्यांच्यापुढे स्थलांतर नेमके करायचे कोठे, असा प्रश्न कायम आहे.

अशातच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथील आदिवासी पाड्यात डोंगर कोसळून अनेक कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची घटना घडली. यामुळे चिपळूण प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. दरडीचा धोका असलेल्या तालुक्यातील १३ गावांमधील ३६ वाड्यांतील लोकांना स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत.

यामध्ये पेढे कुंभारवाडी, परशुराम घाटमाथा, तिवरे येथील गावठाणवाडी, कातकरवाडी, भेंदफणसवाडी, भेंद-धनगरवाडी, कुंभारवाडी, गंगेचीवाडी. तिवडीतील राळेवाडी, उगवत वाडी, भटवाडी. रिक्टोली येथील इंदापूरवाडी, मावळतवाडी, गावठाणवाडी, मधलीवाडी, बौद्धवाडी, देऊळवाडी. नांदिवसेमधील राधानगर, स्वयंदेव, वाकरी धनगरवाडी, बावलाई धनगरवाडी.

कादवड धनगरवाडी, ओवळी येथील काळकाई-धनगरवाडी, धामनदी-धनगरवाडी, बुरंबवणेवाडी, खेंड-धनगरवाडी. कळकवणे येथील रांगी धनगरवाडी, खलिफा धनगरवाडी. कोळकेवाडीमधील खारवार- धनगरवाडी, हसरेवाडी, जांभराई धनगरवाडी, कोळवणे धनगरवाडी, माच धनगरवाडी, बोलाडवाडी. पिंपळी बुद्रुक, कुंभार्ली येथील लांबेवाडी, पेढांबेतील दाभाडी, रिंगी धनगरवाडी, येगाव येथील ढोकबाव सुतारवाडी, कळंबट गवळीवाडी आणि गोवळकोट बौद्धवाडी व मोहल्ला अशा गावांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील व एनडीआरएफच्या पथकाने कादवड व तिवडी येथील दरडीचा धोका असलेल्या वाड्यांना भेटी दिल्या. तेथील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याचे आवाहन केले. या वेळी पथकप्रमुख बी. बी. पाटील, भास्कर कांबळे, मिलिंद केळसकर, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील आदी उपस्थित होते.

चिपळुणात २६ निवारा केंद्रे

तालुक्यात दरडीचा धोका असलेल्या ३६ वाड्या व १७ पूरग्रस्त ग्रामपंचायतीसाठी प्रशासनाने २६ निवाराकेंद्राची उभारणी केली आहे. ही निवाराकेंद्रे तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. यामध्ये शाळा, मंदिरे, सार्वजनिक सभागृहाचा समावेश आहे. निवारा केंद्रात आपत्कालीन स्थितीत दाखल झालेल्या लोकांची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी १८ नोडल अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली १८ पथके स्थापन केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT