चिपळूण: कोळकेवाडी कालव्यात शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी बुडालेल्या दोघांपैकी ऐश्वर्या खांडेकर हिचा मृतदेह गुरुवारी सकाळी पाण्यात तरंगताना महाड येथील साळुंखे वॉटर रेस्क्यू टीमला आढळला. बेपत्ता असलेल्या सुजय गावठे याचा शोध अद्याप सुरूच आहे. वॉटर रेस्क्यू टीम संपूर्ण धरण परिसरात त्याचा शोध घेत असून पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने शोधमोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत. तहसीलदार जयराज सूर्यवंशी तसेच शिरगावचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील परिसरात तळ ठोकून आहेत.
चिपळूण अलोरे येथील सुजय गावठे, ऐश्वर्या खांडेकर, शाहीन कुट्टीनो व रुद्र जंगम हे चौघेजण बुधवारी सायंकाळी ५ वाजता कोळकेवाडी धरण परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. सोबत त्यांचा पाळीव श्वान देखील होता. हे चौघेही धरण परिसराच्या कालव्यात उतरले होते. मात्र, कालव्यातील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज त्यांना आला नाही आणि चौघेही प्रवाहासोबत वाहून गेले.
यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने नजिकच्या ग्रामस्थांनी शाहिन कुट्टीनो व रूद्र जंगम यांना पाण्यातून बाहेर काढले. तर सुजय गावठे, ऐश्वर्या खांडेकर हे दोघेजण पाण्याच्या प्रवाहासोबत धरणाच्या दिशेने वाहत गेले. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या शोध घेण्यात आला. मात्र, ते कोठेही आढळले नाहीत. अखेर गुरुवारी सकाळी महाड येथील साळुंखे वॉटर रेस्क्यू टीमला पाचारण करीत त्यांचा शोध घेण्यात आला. यामध्ये ऐश्वर्या खांडेकर हिचा मृतदेह आढळून आला.
रात्री देखील ही मोहीम सुरू राहणार...
दुपारी १ वाजता अवजल कोळकेवाडी धरणात सोडण्यात आल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे शोध कार्यात अडचण येत होती. परंतु, सायंकाळी पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात आली. चिपळूण नगरपरिषदेकडील विजेचे साहित्य वापरून रात्री देखील ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.