CHIPLUN  SAKAL
कोकण

Chiplun : जिल्हा राष्ट्रवादीत नाराजी, खदखद

खासदार तटकरेंच्या हजेरीत पडसाद; काहीजण गैरहजर

नागेश पाटील -सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : जिल्हा परिषद, पंचायत समिती व पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत धुसफूस वाढू लागली आहे. खासदार सुनील तटकरे नुकतेच चिपळुणात येऊन गेले. जिल्हा बैठकीत माजी आमदार रमेश कदम यांनी एकप्रकारे नाराजी व्यक्त केली तर माजी पंचायत समिती सभापती शौकत मुकादम यांनी बैठकीला दांडी मारली.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक नुकतीच सावर्डे येथे पार पडली. या बैठकीसाठी खासदार तटकरे हे चिपळुणात एक दिवस आधीच वस्तीला होते. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत महामार्गावरील खड्डे व अन्य प्रश्नांविषयी बैठक बोलवावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे करण्यात आली होती; मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आला. दरम्यान, झालेल्या बैठकीत गुहागर विधानसभा मतदार संघाविषयी तटकरे आक्रमक बोलतील, अशी कार्यकर्ते यांची अपेक्षा होती; मात्र तटकरेंनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर टीकाटिप्पणी करण्याला बगल दिली.

खासदार सुनील तटकरे जिल्हा दौऱ्यावर आले असताना महामार्गावरील खड्डे व अन्य प्रश्नांविषयी प्रशासकीय अधिकाऱ्‍यांची बैठक घ्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याकडे केली होती. तटकरे हे वस्तीला आले होते. त्यामुळे सकाळच्या सत्रात बैठक घेणे शक्य होते; मात्र जिल्हा पदाधिकाऱ्यांनी तसे न करता केवळ बैठकीचे नियोजन केले. या नाराजीतून अनुपस्थित राहिलो.

- शौकत मुकादम, माजी सभापती, चिपळूण

ओसाड गावचे सेनापती पद सांभाळून थकलो

बैठकीत माजी आमदार रमेश कदम यांनी, आपल्या भाषणात मला पक्षाने काहीतरी जबाबदारी द्यावी. दीड वर्ष झाले. ओसाड गावचे सेनापती पद सांभाळून थकलो असल्याचे सांगत नाराजीचा सूर लावला. त्यांच्या या विधानावर खासदार सुनील तटकरे यांनी कोणत्याही प्रकारचा शब्द न देता, केवळ तुमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवू, असे स्पष्ट केले. त्याचवेळी तटकरे यांनी आपला मतदारसंघ दापोली, मंडणगडपर्यंत असल्याची सर्वांना जाणीवही करून दिली. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. या बैठकीत माजी आमदार संजय कदम आणि सहदेव बेटकर यांच्यात खटके उडाले होते.

एक नजर..

  1. सावर्डे येथील पक्षाची बैठक गाजली

  2. कार्यकर्त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष

  3. भास्कर जाधवांवरील टिप्पणीला बगल

  4. संजय कदम-सहदेव बेटकर यांच्यात खटके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT