economic cycle sakal
कोकण

चिपळुणात अर्थचक्राला येतेय गती

बाजारपेठेतही सुचिन्हे; निर्बंधमुक्त वावर सुरू, व्यापारीवर्गातून समाधान

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे नियमांच्या बंधनात असलेला चिपळूण तालुका निर्बंधमुक्त झाला. त्यानंतर तालुक्यातील नागरिक निर्बंधमुक्त जीवनाचा आनंद घेऊ लागले आहेत. कोरोनाची साथ आटोक्यात असल्याने राज्य सरकारने १४ जिल्ह्यांमधील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नगिरी जिल्ह्याचाही समावेश आहे. सरकारच्या निर्णयामुळे पर्यटन, उद्योग आदी क्षेत्रातील अर्थचक्र पुन्हा फिरू लागल्याने या निर्णयाचे सर्वसामान्य लोकांनीही स्वागत केले आहे.

येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठीचे कक्ष रिकामे आहेत. अनेक खासगी रुग्णालयातील आपले कक्ष बंदच केले आहेत. निर्बंध उठवल्यामुळे शाळा, हॉटेल, पर्यटनस्थळे, प्रार्थनास्थळे शंभर टक्के क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. लोटे, खेर्डी आणि खडपोली येथील उद्योग आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. मुंबईतून गोव्याकडे जाणारे आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारे पर्यटक जेवणासाठी चिपळूणला थांबतात. त्यामुळे चिपळूण शहर आणि महामार्गावरील हॉटेल्स नेहमी फुल्ल असतात. शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठही आता पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

निर्बंध उठवल्याने शाळा, महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. कोरोनामुळे मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. आयुष्यात कधीही विचार न केलेला हा कार्यकाल अनुभवताना अनेक कटू आठवणी आहेत. याच दरम्यान अनेक जवळचे नातेवाईक सोडून गेले, याचेही दुःख आहे.

-अंकिता देसाई, शिक्षक परांजपे हायस्कूल चिपळूण

दोन वर्षापूर्वी याच कालावधीत लॉकडाउन सुरू झाले. त्यानंतर सर्वकाही ठप्प झाले. सुरुवातीच्या सहा महिन्यांत वीजबिल भरण्याएवढाही व्यवसाय झाला नाही. दुकानाचा प्रत्येक महिन्याचे १२ हजार रुपये भाडे, पतसंस्थेच्या कर्जाचा हप्ता, घरखर्च भागवताना सर्व पुंजी गमवावी लागली. या सर्व कटू आठवणी बाजूला ठेवून वर्षभरापूर्वी नवी सुरुवात केली; परंतु व्यवसायातील तूट भरून काढला आली नाही. आता काही आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वंचित आघाडी'च्या जिल्हाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला; चाकूहल्ला करून मोटारीवर दगडफेक, नेमकं काय घडलं?

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT