Chiplun ST News
Chiplun ST News Sakal
कोकण

Chiplun ST News : चिपळुणात शहरांतर्गत एसटी वाहतूक सुरू; पहाटे पाचपासून गोवळकोट धक्क्यापर्यंत १६ फेऱ्या

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : राज्य परिवहन विभागाच्या चिपळूण आगारातून शहरांतर्गत एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांकडून सामान्य लोकांची होणारी लूट थांबणार आहे.

चिपळूण आगाराने चार दिवसांपूर्वी चिपळूण बस स्थानक ते गोवळकोट धक्कापर्यंत एसटीची फेरी सुरू केली आहे. पहाटे पाच वाजेपासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत एकूण १६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चिपळूण शहरात रिक्षा चालकांकडून सामान्य ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप वारंवार ग्रामस्थांकडून केला जात आहे. मात्र त्यावर कोणीही कारवाई करत नाही. मीटरने रिक्षा चालवण्याचा नियम जणू रिक्षा चालक विसरले आहेत.

एक किमीच्या अंतरासाठी ग्राहकांना तब्बल ६० रुपये मोजावे लागतात. प्रवासी वाहतूक करताना तीस रुपये प्रमाणे एका प्रवाशाचे तिकीट आकारले जाते. शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जायचे असेल तर अंदाजे पैसे सांगितले जातात.

पेट्रोलचे दर वाढले आहेत. परवडत नाही असे कारण दिले जाते. पर्याय नसल्यामुळे अनेक जण जादा भाडे देऊन रिक्षाने प्रवास करतात. आता एसटी सेवा सुरू केल्यामुळे रिक्षा चालकांच्या आर्थिक लुटीला लगाम बसणार आहे. प्रामुख्याने विद्यार्थी आणि महिलांची गैरसोय दूर होणार आहे.

चिपळूण ते गोवळकोटपर्यंत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा परिवहन विभागाने उपलब्ध केली आहे. महिलांना या एसटीतून सवलतीच्या दरात केवळ दहा रुपयात प्रवास करता येणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना या एसटीतून मोफत प्रवास करता येणार आहे. विद्यार्थ्यांना दहा दिवसाचे भाडे भरून वीस दिवस प्रवास करता येणार आहे.

एसटीचा जातानाचा मार्ग

शिवाजीनगर बस स्थानकातून सुटणाऱ्या फेऱ्या डीबीजे कॉलेज, विंध्यवासिनी फाटा, बहादूरशेख नाका, काविळतळी, चिपळूण बाजार, मार्कंडी, युनायटेड इंग्लिश स्कूल, चिंचनाका, जुना स्टॅन्ड, उक्ताडमार्ग गोवळकोट धक्क्यावर जातील.

परतीचा मार्ग

गोवळकोट धक्का येथून सुटणाऱ्या फेऱ्या उक्ताडमार्गे मच्छीमार्केट, भाजी मंडई, जुना बस स्टॅण्ड, एसबीआय बँक चिंचनाका, घाणेकर हॉस्पिटल, युनायटेड इंग्लिश स्कूल, देवधर हॉस्पिटल मार्कंडी, काविळतळी, बहाद्दूरशेख नाका, विंध्यवासिनी फाटा, डीबीजे कॉलेज, पावर हाऊस ते बस स्थानकापर्यंत धावणार आहेत.

चिपळूण आगाराने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बस स्थानक ते गोवळकोट धक्कापर्यंत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे महिला आणि विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार आहे. प्रवासाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक मुली शिक्षण अर्धवट सोडून घरी बसत आहेत. सवलतीच्या दरात एसटी प्रवास करता येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात येतील.

- दीपक चव्हाण, आगार प्रमुख, चिपळूण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde Wealth : पंकजा मुंडेंचा व्यवसाय शेती, नावावर एकही गाडी नाही; किती कर्ज अन् किती संपत्ती? वाचा डिटेल्स

Team India Return: वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचं मायदेशात येण्याचं शेड्युल पुन्हा बदललं, जाणून घ्या आता खेळाडू कधी परतणार?

Weather Update: महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये 6 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Call Drop : फुल नेटवर्क असतानाही बोलता बोलता कॉल होतोय कट? ही आहे कॉल ड्रॉपची समस्या; कशी कराल दूर,जाणून घ्या

जावेद अख्तर यांच्या पिण्याच्या सवयीला वैतागलेल्या शबाना आझमी; का घेतला दारू सोडण्याचा निर्णय? ३३ वर्षांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT