CM Eknath Shinde plans for Shiv Sena to increase its electoral presence by contesting more seats in the Konkan region. Esakal
कोकण

CM Eknath Shinde: महायुतीत एकनाथ शिंदेच वरचढ! कोकणात लढवणार सर्वाधिक जागा? भाजप, राष्ट्रवादीला फक्त 'इतक्या' जागा

आशुतोष मसगौंडे

राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अशात युती, आघाडीत सर्व पक्ष जागावाटपाच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीच्या मुंबईत तर महायुतीच्या बैठाक दिल्लीत होत आहेत. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्ली येथे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत जागावाटपावर चर्चा झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

अशात कोकणातील विधानसभा मतदारसंघाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच सर्वाधिक जागा लढवणार आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आणि काही खासदारांना बरोबर घेत शिवसेना फोडली. त्यानंतर पुढे त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ही मिळाले. दरम्यान शिवसेना एकत्र होती त्यावेळी जितक्या जागा शिवसेना लढवायची, तेवढ्याच जागा आता शिवसेना कोकणात तढवणार आहे. याची माहिती सूत्रांनी दिली.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना कोकण पट्ट्यात सर्वाधिक जागा लढवणार आहे. तर राज्यात सध्या सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपला मात्र 5 ते 6 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

दुसरीकडे जुलै 2023 मध्ये अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही महायुतीमध्ये सहभागी त्यामुले सगळ्याच पक्षांच्या वाट्याला येणाऱ्या जागा कमी झाल्या आहेत. अशात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोकणात अवघ्या दोनच जागा मिळू शकणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

सर्वच पक्षांची जोरदार तयारी

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे शरद पवार पक्षप्रवेश, सभा आणि मेळावे घेत राज्यातील लोकांपर्यंत पोहचत आहेत. तर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनीही मराठवाडा विदर्भ दौरे करत कार्यकर्त्यांना बूस्ट दिली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध कार्यक्रमासाठी राज्यात विविध ठिकाणांना भेट देत आहेत.

सध्या राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनेही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचायला सुरूवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला डंपरने चिरडले, कोथरूडमध्ये भीषण अपघात

VBA Candidates: विधानसभेसाठी 'वंचित'कडून 10 उमेदवार जाहीर; सर्व उमेदवार मुस्लिम

Diabetes Patch: नवरात्रीत कतरिनाच्या हातावर असलेले 'डाबिटीज पॅच' नेमकं कसं कार्य करतं, वाचा सविस्तर

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी घेतली नरेंद्र मोदी यांची भेट

वयाच्या ६५ व्या वर्षी संजय दत्तने पुन्हा केलं लग्न? तिसऱ्या पत्नीसोबत सप्तपदी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT