कोकण

जिल्हाधिकारीपदी नियुक्तीचा आदेश व्हायरल; गुपित फुटले अन्

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : आयएएस परीक्षेचा अभ्यास (Study of IAS Exam) करीत असल्याने गावात प्रतिष्ठा मिळत होती, घरात कौतुक होत होते; मात्र परीक्षेमध्ये नापास झाल्याने गावात आणि घरात नाचक्की होणार याची भीती होती. त्यात लग्न झाले. हे सर्व बालंट दूर करण्यासाठी त्याने शक्कल लढविली. एका मित्राला हाताशी धरून आपण भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी (Officers In The Indian Administrative Service)म्हणून रत्नागिरीत जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याचा आदेश स्वतः काढला.

या आदेशाची खात्री करण्यासाठी नातेवाइकांनी तो व्हायरल केला आणि रचलेले सर्व कुभांड ओणी (ता. राजापूर) (Rajapur) येथे पोलिसांनी अर्जुन संकपाळ (रा. उपवडे, ता. करवीर जि. कोल्हापूर) याला अटक केल्यानंतर बाहेर पडले. या प्रकरणी पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या अक्षय गुडपे (कोल्हापूर) या दुसऱ्या व्यक्तीलाही अटक केली आहे. त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

Collector replaced crime ratnagiri kokan marathi news

कोल्हापूर जिल्ह्यातील उपवडे (ता. करवीर) येथील अर्जुन संकपाळ याची उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी धडपड सुरू होती. अभ्यास सुरू होता, त्याचे वागणेही तसे होते. आपण आयएएस परीक्षा देऊन जिल्हाधिकारी व्हायचे हा त्याने निश्‍चय केला होता. या दरम्यान त्याचे जानेवारी महिन्यात कोल्हापूर येथील तरुणीशी लग्न झाले. अभ्यास करण्याबरोबर तो जमिनीचेही व्यवहार (Land transactions)करत होता. त्यातून काही पैसेही त्याला मिळत होते. ओणी येथील रिसॉर्टमध्ये तो वारंवार राहायला येत होता. त्याचे बिलदेखील चार लाखांच्या दरम्यान झाले, तेही त्याने भागवले होते. मात्र, आयएएस परीक्षेचा निकाल लागला आणि त्याच्या मनसुब्यावर पाणी फिरले.

आपण नापास झाल्याचे समजल्यावर सर्व मान, प्रतिष्ठा धुळीस मिळणार हे त्याच्या लक्षात आले. त्याने मित्र बोडके याला हाताशी धरले. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, संचालक, मुंबई येथे बदली झाली आहे आणि रत्नागिरी जिल्हाधिकारी म्हणून अर्जुन संकपाळ (भा. प्र. से.) यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने शासनाकडे रुजू झाल्याने बदली झाल्याचा बनावट आदेश त्यांनी तयार केला. आपण जिल्हाधिकारी झाल्याचे त्याने जवळच्यांना सांगितले. त्यापैकी काहींनी खात्री करण्यासाठी तो आदेश व्हायरल केला आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा बोगस प्रकार पुढे आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

एसपींना मिळाली टीप

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा फेक आदेश व्हायरल झाल्यानंतर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार नोंदविल्याने अर्जुन संकपाळ (Arjun Sankpal)घाबरून ओणी येथे लपून बसला होता. याची गुप्त माहिती पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांना मिळाली. त्यांच्या आदेशानंतर पथके तयार करून संकपाळला ओणीत जेरबंद केले.

Collector replaced crime ratnagiri kokan marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT