कोकण

लाटांचे तडाखे अन ढासळणारे किनारे

असुरक्षितता अधोरेखित; दुरूस्तीवर भर अपेक्षित

- राजेश शेळके

रत्नागिरी : तौक्ते वादळाने पुन्हा एकदा जिल्ह्यातील किनारे असुरक्षित असल्याचे अधोरेखित केले आहे. भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याच्यादृष्टीने प्रशासनाला बराच टप्पा पार करावा लागणार आहे. समुद्राचे उधाण थोपविण्यासाठी अपेक्षित धूप्रतिबंधक बंधार्‍यांसह इतर उपाययोजनांची कमतरता भासत आहे. त्यामुळेच तौक्ते वादळामुळे निर्माण झालेल्या लाटांचे काही तास तडाखे खात किनार्‍यांची प्रचंड धूप होऊन तेथील नागरिक गर्भगळीत होत आहेत.

तौक्ते वादळाच्या धोक्याचा इशारा प्रशासन तीन दिवसांपासून देत आहे. मात्र आज प्रत्यक्षात वादळ जिल्ह्याच्या किनारपट्टीवरून घोंगावत आले तेव्हा अनेकांच्या मनात धडकी भरली. ताशी वार्‍याचा वेग 40 किमी होता. सर्वत्र पडझड, रस्ते मोकळे, झाडे उन्मळुन पडलेली, छप्पर उडालेली, अनेक ठिकणी रस्त्यांवर झाडे आडवी झालेली, मार्गावर बॅनर, फलक आडवे झालेले, अशी दशा वादळाने केली.

जिल्ह्याच्या किनार्‍यावर सायंकाळी तौक्ते वादळ धडकले आणि सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले. फियान, निसर्ग चक्रीवादळाने केलेली दैना याची कटु आठवण गाठिशी असल्याने नागरिकांचे वादळाकडे बारीक लक्ष होते. आज पहाटे वादळ किनार्‍यावर धडकण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सायंकाळी तीन नंतर वादळाचा परिणाम जिल्ह्याच्या किनार्‍यावर दिसू लागला. समुद्राला उधाण आल्याने मिर्‍यासह काही भागांमध्ये सुमारे 4 ते 5 मीटरहून उंच लाटा उसळत होत्या. त्या लाटा किनार्‍यावर येऊन आदळल्याने किनार्‍याची मोठ्या प्रमाणात धूप होत आह

सक्षमिकरण करण्याची गरज

जिल्हा प्रशासनाने भविष्यात येणार्‍या अशा नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी किनार्‍यांचे सक्षमिकरण करण्याची गरज आहे. मिर्‍या धुपप्रतिबंधक बंधारा, काळबादेवी, भाट्ये, जयगड, खालगाव, आंबेळगड, नाट्ये, व्यत्ये, गुहागर हे किनारे अशा नैसर्गिक आपत्तीला तोंड देऊ शकतील एवढे मजबूत करण्याची गरज आहे. अन्यथा मिर्‍या प्रमाणे किनार्‍याची धूप होऊन समुद्र नागरी वस्तीत आल्याशिवाय राहणार नाही. भविष्याचा विचार करून प्रशानाने ही पावले उचलण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT