कोकण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उदयापासून 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण

कोणत्याही परिस्थितीत 45 वर्षाखालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

ओरोस : जिल्ह्यामध्ये (sindhudurg district) 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे कोवॅक्सीन (co-vaccine) लसीच्या पहिला व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र उद्या (5) आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर (vaccination center) एकूण 7 हजार 680 लसी उपल्बध असणार आहेत. यावेळी कोणत्याही परिस्थितीत 45 वर्षाखालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित संस्थांना पाठविण्यात आलेली असून त्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. तरी 45 वर्षावरील नागरिकांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रनिहाय लस उपलब्ध अशी ः वैभववाडी तालुका ः वैभववाडी - 80, उंब्रड - 80, करुळ - 80, तिथवली - 80, कणकवली तालुका ः खारेपाटण - 80, कासार्डे, फोंडा - 80, नडगिवे - 80, पियाळी - 80, नरडवे - 80, दिगवळे - 80, हरकुळ खुर्द - 80, शिरवळ - 80, हळवल - 80, जानवली - 80, बिडवाडी - 80, भारणी - 80, करुळ - 80, कणकवली कॉलेज - 160, देवगड तालुका ः फणसगाव - 80, देवगड ग्रामीण रुग्णालय 160, गिर्ये - 80, पुराळ - 80, नाडन - 80, बापार्डे - 80, पाटगाव - 80, कोटकामते - 80, नारिंग्रे - 80, जामसंडे - 80, वरेरी - 80, तळवडे - 80, कुवळे - 80, मालवण तालुका ः आचरा - 80, पेंडूर - कट्टा ग्रामीण रुग्णालय - 60, मालवण ग्रामीण रुग्णालय 160, निरोम - 80, रेवंडी - 80, वेराल - 80, देवबाग - 80, नांदोस - 80, पेंडूर - 80, हेदुळ - 80, वायंगवडे - 80, काळसे - 80.

कुडाळ तालुका ः जिल्हा सामान्य रुग्णालय - 160, ग्रामीण रुग्णालय कुडाळ - 160, कुपवडे - 80, घोडगे - 80, कुंदे - 80, आंब्रड - 80, सरंबळ - 80, बांबुळी - 80, केरवडे तर्फ माणगाव - 80, मंडकुली - 80, निवजे - 80, अकेरी - 80, गोवेरी - 80, नेरुर - 80, वेंगुर्ले तालुका ः रेडी 80, ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ला -160, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा - 60, परुळे बाजार - 80, निवती - 80, आडेली - 80, पालकरवाडी -80, तुळस - 80, मातोंड - 80, सागरतिर्थ -80, शिरोडा ग्रामपंचायत - 100, सावंतवाडी तालुका ः उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी - 160, सोनुर्ली - 80, साटेली - 80, कलंबिस्त - 80, कारिवडे - 80, तळवडे 2 -80, नेमळे - 80, फणसवडे - 80, ओवळीये - 80, इन्सुली - 80, रोनापाल - 80, दोडामार्ग तालुका ः तळकट -80, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग - 160, पाल पुनर्वसन - 80, पिकुळे - 80, अंबेली - 80, डिगवे - 80, कुंब्रल - 80 अशा एकूण 7 हजार 680.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT