Lockdown esakal
कोकण

रत्नागिरीत ‘ब्रेक द चेन’ चे निर्बंध शिथील ; असे आहेत नविन नियम

राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोविडच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करणारे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी जारी केले आहेत. आजपासून जिल्ह्यातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे. उपहार गृह, दुकाने, शॉपिंग मॉल रात्री दहा वाजेपर्यंत सुरु. मात्र कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करणे आवश्यक.

कोव्हिडची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. परंतु अद्यापही कोव्हिड रुग्ण आढळून येत असल्याने राज्यात कोव्हिड प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण नव्याने निर्देश पारित केले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ते शासनाकडील पुढील आदेश होईपर्यत खालील प्रमाणे निर्देश पारीत केले आहेत.

उपहारगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची मुभा

उपहारगृह, बारमध्ये मास्कचा वापर अनिवार्य राहील.याठिकाणी काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचा-यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहे. असेच कर्मचारी व व्यवस्थापक काम करू शकतील.

खेळाबाबतच्या सूचना

जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून ,स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व सुरु ठेवण्याची मुभा आहे. इनडोअर स्पोटर्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस पूर्ण व दुसरा डोस झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

शासकीय आस्थापनाना शिथिलता

सर्व शासकीय , निमशासकीय आस्थापनाचे कर्मचारी, बॅक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण करण्यात यावे. ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पुर्ण झालेले असेल त्या आस्थापनाना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देली आहे.कार्यालये 24 तास सुरू ठेवण्याबरोबरच 25 टक्के उपस्थिती मर्यादित केली आहे. जिल्हयातील सर्व मैदाने, उद्याने चौपाटया, समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरु राहतील.

विवाह सोहळ्याना 50 टक्के उपस्थिती

विवाह सोहळे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालय सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. खुल्या प्रांगणात, लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय,हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल.

कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिका-याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. या निर्बधाचे उल्लंघन करणा-यांवर तसेच संबंधित हॉटेल, कार्यालयांवर दंडात्मक कारवाई तसेच संबंधित हॉटेल ,मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

धार्मिक स्थळ, सिनेमागृह बंदच

जिल्हयातील सिनेमागृह,नाट्यगृह,मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. जिल्हयातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील. कोव्हिड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हयांत गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे, इ. वरील निर्बंध कायम राहतील.

बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांना आरटीपीसीआर

ज्या नागरिकाचे कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकाना, बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल, मात्र प्रवाशांसाठी 72 तास पुर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहील.

तर पूर्णतः टाळेबंदी

मेडीकल ऑक्सीजनची उपलब्धता मर्यादीत असल्याने, जर रुग्णसंख्या वाढल्यास व कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन जास्त ऑक्सीजन लागत असल्यास संपूर्ण जिल्हयात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करून त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT