मंडणगड (रत्नागिरी) : पूर्वी तालुक्यातील डोंगर, पठारावर करण्यात येणारी नाचणी आता शेतातून दिसू लागली आहे. लहान मुलांप्रमाणेच वयोवृद्धांना नाचणीचे सत्व उपयुक्त असते. सकस आहारामध्ये नाचणीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन वाढावे यासाठी कृषी विभागाने प्रोत्साहन योजना सुरू केली. मध्यंतरी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेल्या नाचणी पिकाचे शिवार पुन्हा एकदा बहरू लागले आहेत. तालुक्यात मंडणगड, म्हाप्रळ, देव्हारे, वेसवी विभागात सुमारे ९१६ हेक्टरवर नाचणी लावणी करण्यात येत आहे.
पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर तयार होणारे नाचणीचे पीक रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. भातानंतर नाचणीचे पीक येथील शेतकरी घेतात. मात्र योग्य भाव मिळत नसल्याने या पिकाकडे पाठ फिरवण्यात आली होती. तसेच हे पीक डोंगर माथ्यावर मोठ्या प्रमाणात घेतले जात असे, मात्र जमीन विक्रीमुळे डोंगर माळराने कमी झाली. त्याचा या पिकावर परिणाम झाला. पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत गेले. कुपोषणावर मात करण्यासाठी हे धान्य योग्य असल्याने सरकारने नाचणीचा सकस आहारामध्ये समावेश केला आहे.
डोंगरावरील नाचणी आता शेतातून बहरली
नाचणीची भाकरी आरोग्याला खूपच उपयुक्त ठरते. नाचणीला दरही चांगला मिळतो आहे. त्यामुळे अनेक शेतकरी व्यावसायिक दृष्टीकोनातून त्याचे उत्पादन घेवू लागले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाचणीला चांगला प्रतिसाद दिल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तालुक्यातील भात शेतीबरोबर नाचणीचे शिवार दिसून येत आहे.
पूर्वी डोंगर परिसरात सर्वत्र नाचणीचे पीक घेतले जात असे. त्याला डोंगर करणे म्हणत असत. मात्र कालांतराने या पिकाकडे पाठ फिरवण्यात आल्याने उत्पादन कमी झाले. आता त्याचे महत्व समजल्याने पुन्हा नाचणीकडे शेतकरी वळला आहे.
नथुराम कलवणकर, शेतकरी.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.