Malaria 
कोकण

मालवणवासीयांवर आणखी एक संकट ; आरोग्य यंत्रणा झाली अलर्ट

प्रशांत हिंदळेकर : सकाळ वृत्तसेवा

मालवण (सुंधुदुर्ग) : कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी होत असताना तालुक्यात डेंगी आणि शहरात मलेरियाचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणेने रुग्ण आढळून आलेल्या भागात प्रभावी उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर साथरोगाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसात ज्या व्यक्ती परजिल्ह्यातून आल्या आहेत त्यांनी ग्रामीण रुग्णालयात जात तपासणी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी केले आहे.

कोरोनाचे संकट कमी होत असताना आता तालुक्यात डेंगीचा एक तर मलेरियाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाचे संकट कमी होत असताना आता तालुक्यात डेंगीचा एक तर मलेरियाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. संबंधित रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यातील कुंभारमाठ येथील डेंगीचा एक तर वायरी गावकरवाडा व बांगीवाडा येथील प्रत्येकी एक असे दोन मलेरियाचे रुग्ण सापडून आले आहेत. आरोग्य विभागास याची माहिती मिळताच रुग्ण आढळून आलेल्या भागाचा सर्वे करून डास प्रतिबंधात्मक फवारणी तसेच अन्य अत्यावश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डेंगीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. डेंगीची उत्पत्ती ही नकळतपणे घरातूनच होते. कारण बंद कुलर, फ्रीजमधील पाणीच घातक ठरू शकते. या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊन डेंगी आजाराला आमंत्रण मिळते.

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून राहत असल्याने डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे पावसाळी कालावधीत डेंगी रुग्णांचे प्रमाण सर्वत्र वाढलेले दिसते. डेंगी आजाराची लागण होऊ नये यासाठी सध्या वापरात नसलेल्या कुलरमधील पाणी पूर्णतः काढून कुलर कोरडा ठेवावा. तसेच फ्रीजमधील मागील बाजूस साठणारे पाणीही डास पैदास करते तेही किमान आठ दिवसांनी कोरडे करून स्वच्छ ठेवावे. घरातील विनावापर पाणी, करवंटी, टायर, घराच्या परिसरात पाणी साचून राहणार नाही, याबाबत विशेष काळजी घेण्यात यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

डेंगीचे रुग्ण

2019 : 02

2020 : 04

2021 : 02

काय घ्याल काळजी?

डेंगीचा संसर्ग होऊ नये यासाठी राहत असल्या परिसरात डासांची पैदास होऊ देता कामा नये. घरातील भांडी कोरडी करावी, शिवाय पिण्याच्या पाण्याची टाकी रोजच्या रोज स्वच्छ धुवावी. शरीर पूर्ण झाकेल असे कपडे परिधान करावे. मच्छरदाणीचा वापर केल्यास डेंगीचा धोका टळेल.

पावसाळ्यात ज्या ठिकाणी पाणी साचते, अशा सर्व ठिकाणी डास अंडी घालतात. त्यातूनच डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. घरातील कुलर, फ्रीजमधील पाणी उघड्यावर टाकून न देता ते गटारात वाहते करावे. कोणत्याही परिस्थितीत पाणी साचणार नाही, याची काळजी घेतली तर डेंगीची साथ पसरण्याचा धोका कमी होईल.

डॉ. कुबेर मिठारी, तालुका आरोग्य अधिकारी, मालवण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT