Developed technique of making tiles from jamb stone at Devgad 
कोकण

चिऱ्यापासून टाईल्स! देवगडात तंत्र विकसित

संतोष कुळकर्णी

देवगड (सिंधुदुर्ग) - मार्बल, ग्रॅनाईडसह अन्य दगडापासून टाईल्स बनवल्या जातात, मग कोकणातील जांभ्या दगडापासून टाईल्स बनतील का? असा विचार समोर आला. यातून सुरू झाला जांभ्या दगडापासून (चिरे) टाईल्स बनवण्याचा कारखाना.

देवगडमधील विजय प्रमोद ऊर्फ बंटी कदम या तरूणाने आपल्या सहकाऱ्यांसह जांभ्या दगडापासून टाईल्स बनवणारे तंत्र विकसित केले. वर्षभराच्या प्रात्यक्षिकासह नव्या व्यवसायाची नांदी केली. पुणे, मुंबई आदी प्रमुख शहरातील इंटीरियर डिझाईनरकडून अशा टाईल्सना मागणी वाढू लागली. यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ लागला. 

केरळ, कर्नाटकमध्ये अशा पध्दतीने तयार केलेल्या टाईल्स महाराष्ट्रात विक्रीस येतात. यातूनच हा नवा विचार समोर आला. श्री. कदम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी चिऱ्यांपासून टाईल्स बनवणारे यंत्र बनविले. सुरूवातीला वर्षभर त्यांचे प्रात्यक्षिक सुरू होते. सरावानंतर यश येऊन आता चांगल्या टाईल्स तयार होत आहेत. गेल्या सुमारे वर्षभरापासून व्यवसाय सुरू झाला.

एका बॉक्‍समध्ये 20 एमएम जाडीचे 6 बाय 12 इंचाचे 5 टाईल्सचे नग असतात. एका बॉक्‍समध्ये सुमारे अडीज स्वेअरफूट इतके काम होते. तयार टाईल्सना पुणे, मुंबई येथील इंटीरियर डिझाईनर तसेच स्टोन टाईल्स व्यावसायिक यांच्याकडून मोठी मागणी आहे. यासाठी स्थानिक तरूणांना प्रशिक्षण देण्यात आले. तीन कारागीर सध्या काम करतात. स्थानिक पातळीवरून निवडक चिरे उपलब्ध केले जातात. जांभ्या दगडापासून टाईल्स बनवणारा जिल्ह्यातील बहुदा पहिलाच प्रयत्न असल्याचे श्री. कदम आवर्जुन सांगतात. 

इमारतीचे तापमान स्थिर राखण्यास मदत 
आतापर्यंत सुमारे 25 टनापेक्षा अधिक टाईल्स शहरात पाठवण्यात आल्या. 10 टन टाईल्स तयार होण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी जातो. जांभ्या दगडामुळे इमारतीचे तापमान स्थिर राखण्यास मदत होते. इमारतीच्या पुढील बाजूच्या सुशोभिकरणासाठी टाईल्सचा चांगला वापर करता येतो. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT