कोकण

आगारातील अंधार दूर

CD

- rat४p१३.jpg -
२४M८७७७२
गुहागर आगारात बसविण्यात आलेले पथदीप.

गुहागर आगारातील अंधार दूर

तातडीने कामाला प्रारंभ ; काँक्रिटीकरणाला मुहूर्त सापडेना

सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ४ : गुहागरचे एसटी आगारातील पथदीप दुरुस्त करण्यात आले असून आगार प्रकाशमान झाले आहे; मात्र वर आलेली खडी आजही धोकादायक ठरत असून काँक्रिटीकरणाला अद्याप मुहूर्तच मिळालेला नाही.
गुहागर आगारातील कार्यशाळा व प्रशासकीय कामकाजठिकाणी हायमास्टसहित लख्ख प्रकाश पडलेला दिसून येत होता. ज्या प्रवाशाच्या भरवश्यावर एसटी चालते त्याच प्रवाशाला मात्र अंधारात चाचपडत एसटी सेवा घ्यावी लागत आहे. याबाबत ''सकाळ''मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल आगारप्रमुख व विभागीय पातळीवरून घेण्यात आली आहे. त्यानंतर तातडीने दिवे दुरुस्त करण्यात आले आहेत. पार्किंगच्या ठिकाणी नादुरुस्त ट्यूबही बसवण्यात आल्या आहेत. आगार प्रकाशमान झालेले दिसून येत आहे. अजूनही आगारातील खड्डे पडलेले व खडी वर आलेली स्थिती कायम असून येथील काँक्रिटीकरणाला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, डिसेंबर २०२३ ला येथील काँक्रिटीकरणाचे काम अलोरे येथील आशिष मुहारेकर यांना देण्यात आले आहे. प्रलंबित कामाची बातमी प्रसिद्ध होताच दोन दिवसातच कामाला सुरवात करतो, असे येथील आगारप्रमुख सोनाली कांबळे यांना सांगितले होते; परंतु अद्याप काम सुरू केलेले नाही. यामुळे ठेकेदाराने एसटी महामंडाळाच्या अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी सुरू ठेवली आहे. याबाबत कांबळे यांनी पथदीप दुरुस्ती ही संबंधित ठेकेदाराकडून करवून घेतली आहेत; मात्र काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदाराने आज येतो उद्या येतो, असे म्हणत अजूनही काम प्रलंबित ठेवले असल्याचे सांगितले.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT