political esakal
कोकण

महाआघाडीचं ठरलं! सेना 8, राष्ट्रवादी-काँग्रेस 5, अपक्षासाठी 1 जागा

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा शिवसेना (Shivsena) आठ, राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) प्रत्येकी पाच, तर अपक्ष एक असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे; मात्र सावंतवाडी तालुका मतदारसंघाची शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागेवर अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. (District Bank Election 2021) विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व सुशांत नाईक यांचे मतदारसंघ अद्याप निश्चित नाहीत. याबाबत मागाहून माहिती दिली जाईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी येथे दिली. जिल्हा बँकेचा २०१५ ते २०२१ या कालावधीतील कार्यअहवाल सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये प्रकाशित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार राऊत, आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार राऊत म्हणाले, 'सतीश सावंत (Satish Sawant) यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा बँक निवडणूक लढवत आहोत. सतीश सावंत कोण, असे २०१९ मध्ये विचारणारे लोक आता घाबरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे सतीश सावंत यांची बदनामी सुरू करण्यात आली आहे.’’ यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जान्हवी सावंत, उमेदवार व्हिक्टर डांटस, प्रवीण भोसले, विकास सावंत, दिगंबर पाटील, विद्याप्रसाद बांदेकर, विलास गावडे, गणपत देसाई, सुशांत नाईक, लक्ष्मण आंगणे, एम. के. गावडे, विनोद मर्गज, आनारोजीन लोबो, नीता राणे, आत्माराम ओटवणेकर, मनीष पारकर, मेघनाथ धुरी आदी उपस्थित होते.

मोठ्या फरकाने जिंकणार

यावेळी पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) म्हणाले, 'सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकेल. (कै.) शिवरामभाऊ जाधव यांचा वारसा सतीश सावंत चालवत आहेत. ते कुठेही इकडे-तिकडे जाणार नाहीत. विरोधक त्यांच्यात व शिवसेनेत वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु तसे काही होणार नाही. आमचे सर्व उमेदवार तगडे व सहकाराची जाण असलेले आहेत.' सावंतवाडी मतदारसंघ उमेदवारी जाहीर न करण्यामागे विशेष कारण नसल्याचेही सामंत म्हणाले.

हे आहेत उमेदवार

राऊत यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार शिवसेनेचे सतीश सावंत, दिगंबर पाटील, गणपत देसाई, सुशांत नाईक, लक्ष्मण आंगणे, आनारोजीन लोबो, मनीष पारकर हे उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस, सुरेश दळवी, एम. के. गावडे, विनोद मर्गज, आत्माराम ओटवणेकर, तर काँग्रेसकडून विद्याप्रसाद बांदेकर, विलास गावडे, विकास सावंत, नीता राणे, मेघनाथ धुरी यांचा समावेश आहे. एक जागा अपक्ष असलेले जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अविनाश माणगांवकर यांना देण्यात आली. सावंतवाडी तालुका मतदारसंघातील जागा शिवसेनेच्या वाट्याला असून तेथे उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

काँग्रेस-शिवसेनेची वेंगुर्लेत उमेदवारी

काँग्रेसला वेंगुर्ले तालुका मतदारसंघ गेला आहे. माजी संचालक विलास गावडे यांनी येथे काँग्रेसकडून अर्ज भरली आहे. तरीही शिवसेनेच्या सचिन देसाई यांनी येथे अर्ज दाखल केला आहे. आज जाहीर यादित ही दोन्ही नावे आहेत. ही जागा काँग्रेसला गेल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले; परंतु उमेदवार अद्याप निश्चित नसल्याचे सांगत शिवसेना येथे इच्छूक असल्याचे अस्पष्टपणे जाहीर केले.

उमेदवार निश्चित; पण मतदारसंघ अनिश्चित

२०१५ च्या निवडणुकीत सतीश सावंत कणकवली तालुका मतदारसंघातुन बिनविरोध निवडणून आले होते. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अध्यक्ष म्हणून काम केले. यावेळी अद्याप त्यांचा मतदारसंघ निश्चित नाही. त्यांनी कणकवली तालुका व जिल्हास्तरीय पतसंस्था मतदारसंघातून अर्ज भरला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या सुशांत नाईक यांनीही याच दोन मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या दोघांची उमेदवारी निश्चित झाली असलीतरी मतदान संघ अद्याप निश्चित नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT