भाविकांनी तोकडी, अंगप्रदर्शक तसेच उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स परिधान करून मंदिरात प्रवेश करू नये.
देवगड : भारतीय संस्कृती, परंपरांचे रक्षण, संवर्धन आणि जतन करण्याबरोबरच मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील मंदिर (Kunkeshwar Temple) प्रवेशासाठी आजपासून वस्त्रसंहिता (Dress Code) लागू करण्यात आली आहे.
तोकडी, अंगप्रदर्शक तसेच उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स परिधान केलेल्या भाविकांना थेटपणे मंदिर प्रवेश करता येणार नाही. अशा भाविकांना देवस्थानकडून शाल, उपरणे, पंचा, ओढणी आदी वस्त्रे मोफत देण्यात येतील. दर्शनानंतर ती वस्त्रे परत घेतली जाणार असल्याची माहिती देवस्थानने दिली.
यासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. श्री क्षेत्र मंदिर प्रवेशासाठी देवस्थानने काही मार्गदर्शक फलकही लावले आहेत. काल पहिल्या श्रावण सोमवारी नवी नियमावली लागू करण्यात आली. याबाबत देवस्थानचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी म्हणाले, ‘श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील मंदिर प्रवेशासाठी आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. भाविकांनी तोकडी, अंगप्रदर्शक तसेच उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स परिधान करून मंदिरात प्रवेश करू नये.
येणाऱ्या सर्वच भाविकांना याची माहिती नसेल. त्यामुळे आलेले भक्त दर्शनापासून वंचित राहू नयेत, यासाठी मंदिर प्रवेशावेळी अशा भाविकांना देवस्थानकडून शाल, उपरणे, पंचा, ओढणी, लुंगी आदी वस्त्रे मोफत उपलब्ध करून दिली जातील. हिंदू संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ही रचना केली आहे. त्यामुळे भाविकांनी देवस्थानला सहकार्य करावे.’
यावेळी अजय नाणेरकर, संजय आचरेकर, चंद्रकांत घाडी, गणेश वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम आदी उपस्थित होते. श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ आयोजित रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड आणि कणकवली यांच्या सहकार्याने तिसऱ्या श्रावण सोमवारी (ता. ४) सकाळी ९ ते ३ या वळेत भक्तनिवासमध्ये मोफत आरोग्य शिबिर होणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील मंदिरात आज पहिल्याच श्रावण सोमवारी अनेक भाविकांनी दर्शन घेतले. पहाटेपासून भाविक दर्शनासाठी येत होते. दर्शनासाठी भविकांची रांग होती. मंदिरात भजने सुरू होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.