Driver accident case donoli kokan crime marathi news 
कोकण

हाकेच्या अंतरावरील असलेल्या जंगलात कुत्रा  लागला जोराने भुंकू अन्

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी :  दाणोली येथे मोटार आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघातानंतर पिकअप चालकाने दाणोली येथील जंगलात आत्महत्या केल्याची घटना आज उघड झाली. अक्षय बापू हांगे (वय-23, रा. पळशी ता. माण, जि. सातारा) असे युवकाचे नाव आहे. ही घटना काल (ता.15) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. याबाबत आंबोली येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


दाणोली येथे काल (ता.15) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीहुन साताऱ्याच्या दिशेने पिकअपने अक्षय व त्याचा क्‍लिनर विशाल दुधावले हे जात असताना कोल्हापूर येथून सावंतवाडीच्या दिशेने येत असलेल्या मोटारीला धडक बसून अपघात झाला. यामध्ये मोटार पलटी होऊन नुकसान झाले. या अपघातात पिकपचा चालक असलेला अक्षय हांगे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता कोल्हापूर येथील पर्यटकांनी त्याला पकडले. यावेळी मोटारीचे झालेले नुकसान देण्याची मागणी केली. तब्बल सायंकाळी चार वाजेपर्यंत नुकसानभरपाईची मागणी देण्याबाबत तडजोड सुरू होती. 


अक्षय हा पिकअपमधून टोमॅटोची वाहतूक करीत होता. ज्या मालकाचा हा माल होता. त्याला संपर्क साधून अक्षयने अपघात तसेच नुकसानभरपाई मागणीची कल्पना दिली. यावेळी काही काळाने तडजोड झाल्यावर पर्यटक निघून गेले. यावेळी सायंकाळी पाचच्या सुमारास त्याच्यासोबत असलेला क्‍लीनर दुधावले याला अक्षयने पाणी आणण्यास सांगितले. क्‍लीनर दुधावले हा पाणी घेऊन परतला असता घटनास्थळी अक्षय दिसून आला नाही. यावेळी त्याने परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला तो कुठेही दृष्टीस न पडल्याने त्याने दाणोली येथे ड्युटीसाठी असलेले वाहतूक पोलिसांना याची कल्पना दिली. यावेळी तेथील हाकेच्या अंतरावरील असलेल्या दाणोली बल्लाळ बाग येथील जंगलमय भागात कुत्रा जोर जोराने भुंकत असलेला आवाज येत असल्याने वाहतूक पोलीस व क्‍लिनर त्या दिशेने गेले असता जंगलात अक्षयचा मृतदेह उंच झाडावर गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. 

याबाबतची माहिती वाहतूक पोलिसांनी येथील पोलिस ठाण्यात गेल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश जाधव, आंबोलीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील भोगण, दीपक शिंदे, वाहतूक पोलीस मयूर सावंत आदींनी घटनास्थळी जात पाहणी केली. पंचनामा करण्यात आला. याबाबतची खबर आंबोली दूरक्षेत्र येथे क्‍लिनर विशाल दुधावले याने दिली. याबाबत रात्री उशिरा अक्षयच्या सातारा- पळशी येथील कुटुंबीयांना घटनेबाबत माहिती देण्यात आली. 

आज सकाळी त्याचे कुटुंबीय येथे दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी अद्यापपर्यंत तरी आपली कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. अशी माहिती आंबोली दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील भोगण यांनी दिली. अक्षय याचा अपघातानंतर काही तासातच मृतदेह सापडला यावरून तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत होते. 


संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीचा अर्ज मिस झाला? हरकत नाही, मुदत आणखी वाढलीए! जाणून घ्या नवी तारीख

Santosh Juvekar: भूमिकेसाठी काय पण! संतोष जुवेकरचा ‘रानटी’ चित्रपटातील खतरनाक अंदाज; लूक व्हायरल

Paris Olympic 2024 पदक विजेत्या Manu Bhaker चा रॅम्प वॉक

Amit Thackeray: एकनाथ शिंदेंचा त्याग; अमित ठाकरेंसाठी शिवसेना 'हा' मतदारसंघ सोडणार

Latest Marathi News Live Updates: अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील 'जलसा' निवासस्थानाबाहेर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या

SCROLL FOR NEXT