Eco-friendly lord ganesha statue will in America from Ganeshgule Sculptor Dinesh Kotkar 101 idols sakal
कोकण

Eco Friendly Ganesha Idol : पर्यावरणपूरक ‘बाप्पा’ जाणार गणेशगुळेतून अमेरिकेला; १०१ मूर्ती रवाना होणार

मूर्तिकार ज्ञानेश कोटकरांची निर्मिती ; १०१ मूर्ती रवाना होणार

नरेश पांचाळ

रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे येथील प्रसिद्ध मूर्तिकार ज्ञानेश कोटकर हे गेली ४० वर्षे वडिलोपार्जित ‘श्रीगणपती कला केंद्र’ जपत आहेत. शाडू मातीच्या मूर्ती साकारताना त्यांनी हळूहळू कागदी लगद्यापासून पर्यावरणपूरक ४०० ते ५०० सुबक गणेशमूर्ती बनविण्यास सुरवात केली. या द्वारे ग्रामीण भागात रोजगार निर्माण केला.

त्यांच्या चित्रशाळेत घडणाऱ्या कागदी लगद्यापासूनच्या गणेशमूर्तींची महती देशातच नव्हे तर परदेशातही पोचली आहे. या मूर्तींना अमेरिकेतून मागणी आली आहे. १०१ सुबक गणेशमूर्ती १० जूनला अमेरिकेला रवाना होणार आहेत.

निसर्गाच्या सान्निध्यात राहताना पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी ही संकल्पना अमलात आणली, असे ज्ञानेश यांनी सांगितले. शाडूची जागा प्लास्टर ऑफ पॅरिसने घेतली; मात्र गणेशगुळे-वझरेकरवाडी येथील ज्ञानेश कोटकर यांच्या वडिलोपार्जित श्री गणपती कलाकेंद्रात शाडूच्या मूर्ती बनवत आले आहेत.

पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्यासाठी त्यांनी काही बदल केले. आता केवळ शाडूच्या मातीपासून मूर्ती तयार न करता कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक गणपती तयार करून वितरित करत आहेत.

वडील वसंत कोटकर यांच्याकडून शाडू मातीच्या मूर्तीची कला ज्ञानेश यांनी अवगत केली. पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे आणि मूर्तीचे वजन कमी करणे हे दोन उद्देश कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती साकारण्याचे आहेत. या मूर्ती गेली १० वर्षे ते साकारत आहेत. त्यासाठी कागद, पुठ्ठ्यांची तजवीजही त्यांनी केली आहे.

कागद अथवा पुठ्ठा दोन ते तीन दिवस पाण्यात कुजवून घेतात. मिक्सर ग्राईंडरवर कागद आणि शाडूची माती असे माध्यम वापरून त्याने विविध पोझमधील सुबक मूर्ती साच्यातून तयार करतात. कागदी लगद्याच्या मूर्तींना रंग मात्र वॉटरबेस वापरावे लागतात.

मूर्तींची ने-आण करणे किफायतशीर असल्याने गणेशभक्तांचा कलही वाढत आहे. या गणेशमूर्तींना अमेरिकेतूनही मागणी आली. त्यानुसार त्यांनी १०१ मूर्ती तयार केल्या असून, १० जूनला मुंबईमधून जहाजातून अमेरिकेला रवाना होणार आहेत. दरम्यान, मूर्तिकार कोटकर म्हणाले, या मूर्तींना सुरवातीला जिल्ह्यातून मागणी होती.

आता परदेशातून मूर्ती मागविण्यात आल्या आहेत. पाच ते सहा मिलिमीटर जाडीच्या कागदी लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तींना सांगली, कोल्हापूर, मुंबई, जिल्ह्यात गुहागर, लांजा या ठिकाणीहून दरवर्षी मागणी असते. कुटुंबातील व्यक्तींचे चांगले सहकार्य मिळते तसेच वर्षभर सहा माणसांना रोजगार देतो.

५०० मूर्तींची विक्री

  • कागदी लगद्यापासून मूर्ती

  • प्रथमच अमेरिकेतून मागणी

  • मित्रांच्या माध्यमातून ऑर्डर

  • वडिलोपार्जित कलेची जपणूक

  • ५०० मूर्तींची दरवर्षी विक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT