रत्नागिरी : पक्षी निरीक्षकांना निरीक्षणाप्रसंगी येथील चंपक मैदान परिसरात दुर्मिळ इजिप्शिअन गिधाड (पांढरे गिधाड) आढळून आले. निसर्ग चक्रीवादळानंतर ते भटकंती करीत येथे आले असावे, असा अंदाज वर्तविला जातो. यामुळे गिधाडांमधील दुर्मिळ प्रजातीची नोंद येथे झाली आहे.
पक्षीनिरीक्षक आशिष शिवलकर, डॉ. प्रणव परांजपे आणि ॲड. प्रसाद गोखले यांनी या गिधाडाचे छायाचित्र टिपले. इजिप्शिअन गिधाड हे आकाराने लहान असते. भक्ष्याच्या हाडाच्या आतमधील भाग हे गिधाड सर्वाधिक प्रमाणात खाते. याचे मूळ दक्षिण आफ्रिकेत असून, थंडीच्या हंगामात ते राजस्थान, दक्षिणेकडील राज्यांमध्ये स्थलांतर करते. कोकणात ते दुर्मिळच आहे. काही महिन्यांपूर्वी रायगड-रत्नागिरीला धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका गिधाडांच्या अधिवासाला बसला होता. गिधाडांची घरटी असणारी झाडे उन्मळून पडली. आता परिस्थिती पूर्ववत होऊ लागल्यावर ती आपापल्या निवासस्थानी परतू लागली आहेत.
हेही वाचा - पावणेचार तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या पळविल्या हातोहात: तीन महिला सीसीटीव्हीत कैद -
नऊ वर्षांपूर्वी पिलाचे दर्शन
पक्षीनिरीक्षक भाई रिसबूड, डॉ. रशीद वैद्य, डॉ. सचिन पानवलकर, डॉ. प्रणव परांजपे यांनी पांढऱ्या गिधाडाच्या प्रजातीची नोंद नऊ वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ मध्ये केली होती. चंपक मैदान परिसरातील नैसर्गिक पाणीसाठा आटत आल्याने तेथे टॅंकरने पाणीपुरवठा करून या पक्ष्यांना जीवंत ठेवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या सहाय्याने करण्यात आला. गिधाडास शिकाऱ्यांपासून वाचविण्यासाठीही प्रयत्न केला आहे.
विशेष निरीक्षण...
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.