मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल मेडिकल युनिटसह बाेट अॅम्‍बुलन्स सेवा सुरू होणार आहे. 
कोकण

अशी मिळणार रायगडकरांना अत्याधुनिक जलद आरोग्य सेवा

प्रमाेद जाधव

अलिबाग  : मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल मेडिकल युनिटसह बोट ऍम्बुलन्स सेवा बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित करण्यात येणार आहे. यातून रायगडकरांना अत्याधुनिक जलद आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. 

2019- 20 च्या पुरवणी प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यामध्ये वचनबद्ध ठेवलेल्या अनुदानातून ही सेवा सुरू केली जाणार आहे. रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. याबाबतचा सरकारी निर्णय 7 ऑगस्टला सार्वजनिक आरोग्य विभागाकडून काढण्यात आला आहे.

बोट ऍम्बुलन्स सेवा प्रायोगिक तत्त्वावर एका वर्षासाठी कार्यान्वित केली जाणार आहे. मेडिकल युनिटसाठी लागणारी बोट, यंत्रसामुग्री, औषधे, कर्मचारी, इंधन हे सर्व खर्च नेमण्यात येणाऱ्या बाह्य यंत्रणेकडून करण्यात येतील. काम सुरू झाल्यावर प्रति महिना परिचालन खर्चाचे देयक या बाह्य यंत्रणेस सरकारकडून अदा करण्यात येईल. ही सेवा घेण्याबाबतचे दर निविदा प्रक्रियेअंती निश्‍चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT