festival of holi shimga in konkan with 25 people present at home in ratnagiri 
कोकण

रत्नागिरीकरांना दिलासा; निर्णय झाला, देव येणार घरी

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने रत्नागिरीवासीयांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे देव घरी येण्याचे निश्‍चित झाले. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काढलेल्या नवीन आदेशात देवदेवतांच्या पालख्या २५ लोकांच्या उपस्थितीत घरोघरी नेता येतील, असे नमूद केले आहे. त्यामुळे कोकणातील शिमगोत्सवात भाविकांना आपल्या इष्ट देवतेची घरी भेट होणार आहे.

जिल्ह्यात शिमगोत्सवात १० मार्च २०२१ रोजी आदेश काढले होते. पालखी घरोघरी नेऊ नये, असे त्यात नमूद केले होते. या मुद्द्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी१५ मार्च २०२१ ला शुध्दीपत्रक काढले आहे. त्यानुसार कोरोनाचे सर्व निर्बंध पाळून संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांच्या परवानगीने पालखी २५ लोकांच्या उपस्थितीत घरोघरी नेता येईल. त्या २५ लोकांची कोरोना विषाणूच्या अनुषंगाने योग्य ती आरोग्यविषयक चाचणी करून घेणे आवश्‍यक राहील, असे सुधारित आदेशात 
म्हटले आहे. चाकरमान्यांनी शिमगोत्सवात गावाकडे येणे टाळावे, असे आवाहनदेखील जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे. अगदीच आवश्‍यकता असल्यासच गावाकडे यावे, मात्र कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी किंवा रॅपिड अँटिजेन टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. 

दरम्यान, या पार्श्वभूमीवर गावागावांत ग्रामकृती दल आणि नागरी कृती दल दक्ष ठेवण्यात आली आहेत. मुंबई, पुणेसह बाहेरून येणाऱ्यांचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येकाच्या तापमानाची नोंद घेण्यात येईल. लक्षणं नसलेल्या चारकमान्यांनाच शिमगोत्सवात सहभागी होता येईल. 

एखाद्याला लक्षण आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. यंदाचा शिमगोत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले. प्रसाद वाटप, पालखी नाचवणे आदी कार्यक्रम टाळावेत. गावात आलेली मुंबई, पुणे येथील चाकरमान्यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करावे, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

आवश्‍यक असेल तरच या

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे. भविष्यात काही ठिकाणी वाढ होऊ शकते. शिमगोत्सव कोरोनाचे नियम पाळून साजरा करावा. चाकरमान्यांनी गावाकडे येणे टाळावे, अति गरजेचे असेल तरच गावाकडे या, असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी चाकरमान्यांना केले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandurbar Vidhan Sabha Election 2024: नवापुरात तिन्ही उमेदवारांमध्येच रंगणार लढत; उमेदवार तेच, मात्र पक्ष व चिन्ह बदलण्याची शक्यता

टीम इंडियाला Semi Final गाठण्यासाठी शेवटची संधी; पाकिस्तानची हवीय मदत, जाणून घ्या समीकरण

Amitabh Bachchan : कुली सेटवरील 'त्या' घटनेनंतर अमिताभ साजरा करतात दोनदा वाढदिवस, हनुमान चालीसेने वाचवलेले प्राण

Ladki Bahin Yojana : धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यात 9 लाख `लाडक्या बहिणी`; 30 हजार महिला आधारकार्ड `लिंकिंग`अभावी वंचित

Noel Tata: टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड; 'टाटा सन्स'मध्ये 66 टक्के मालकी

SCROLL FOR NEXT