Folk art is alive tribal art Art of Thakar community in Sindhudurg sakal
कोकण

आदिवासी कलाग्रामने लोककला जिवंत

पिंगुळीतील संस्था; सिंधुदुर्गातील ठाकर समाजाची कला पोहोचली सातासमुद्रापार

अजय सावंत

कुडाळ : एखाद्या लोककलेचे वैभव पुन्हा मिळवून देण्यात हातभार लावणे सोपे नसते. ठाकर समाजाच्या लोककलेला सातासमुद्रापार नेण्यात पिंगुळीतील लोककला भवन आदिवासी कलाग्रामने मोठे योगदान दिले आहे. ‘ठाकरवाडी’ पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानची एक लहानशी वाडी. सध्याच्या कुडाळपासून अवघ्या १ ते २ किलोमीटर अंतरावर पसरणारा आदिवासी पाडा म्हणजेच ‘ठाकरवाडी’. परमपूज्य संत राऊळ महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पिंगुळी गावाच्या बारा वाड्यांपैकी एक वाडी म्हणजेच ठाकरवाडी. काही कलाप्रकार जिवंत ठेवण्याचे काम या वाडीने केले.

गावाच्या उत्तर बाजूच्या सीमेवर असलेल्या या वाडीत फक्त ‘ठाकर’ या एका समाजाची घरे आहेत. खरे तर या वाडीचे खरे नाव ‘ठाकरांचा ट्यांब’. ‘ट्यांब’ म्हणजे डोंगरी उंचवटा. या उंचवट्यावर वसलेली ठाकर वस्ती म्हणजे ‘ठाकरांचा ट्यांब’. काही काळ याच नावाने या वस्तीला ओळखत असत. सध्याच्या काळात या वाडीला ‘गुढीवाडी’ म्हणून ओळखले जाते. ‘गुढीवाडी’ या नावालाही स्वतःचा असा इतिहास आहे. १७३८-१७५९ मध्ये सावंतवाडी संस्थानचे जयराम राजे यांनी मालवणचे तुळाजी आंग्रे यांना शह देण्यासाठी कुडाळ न्यायालयाकडे जात असताना चैत्र शुद्ध प्रतिपदेला या ठाकरवाडीवर ‘दिवाण’च्या आंब्याखाली एका दिवसासाठी वास्तव्य केले. याच आंब्याच्या झाडाखाली गुढी उभारून विजयाची घोषणा दिली. तेव्हापासून ही ठाकरवाडी ‘गुढीवाडी’ (गुढीपूर) या नावाने ओळखली जाऊ लागली.

संपूर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास गुढीपूर सोडून अन्य काही गावात ठाकर अदिवासींच्या छोट्या-छोट्या वस्त्या आहेत. कुठे एक घर, कुठे दोन घरे, कुठे चार, कुठे दहा. अगदी छोट्या-छोट्या संख्येने ही वस्ती आपले अस्तित्व टिकवून आहे; मात्र पिंगुळीतील ही ठाकरवाडी जिल्ह्यातील या आदिवासींची मुख्य राजधानी म्हणायला हरकत नाही. या वाडीवर ११ कलाप्रकार जिवंत होते. गेल्या १२०० ते १५०० वर्षांपासून हे कलाप्रकार ठाकर कलाकार जोपासत आहेत; पण हे कलाप्रकार काळाच्या ओघात पडद्याआड होत गेले. काही कला प्रकार तर सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी सणासुदीला फक्त हे कला प्रकार सादर होत होते. आता तेही ७० टक्केपर्यंत बंद झाल्याचे आपणास पाहावयास मिळतील. मध्यंतरीच्या काळात विनायक खेडेकर, गोवा कला अकादमी, वसंत गंगावणे, दामू केको, बाबूराव सडवेलकर यासारख्या कलाप्रेमींनी या ठाकर कलांवर अभ्यास सुरू केला. ज्येष्ठ कलावंत वसंत गंगावणे यांनी स्थानिक कलाकारांना एकत्र करून या ठाकर कलांना नवीन व्यासपीठ निर्माण करून दिले. त्यांच्या या कार्यात (कै.) सखाराम भि. मसगे व गणपत मसगे या पितापुत्रांनी मोलाचे सहकार्य केले. चित्रकथीच्या पोथ्या एकत्रित करून त्यांचा क्रम लावणे आणि कथानक तयार करण्याचे कार्य यांनी प्रचंड परिश्रमाने केले.

पुढे १९७८ मध्ये महाराष्ट्र सरकारने या कलांचे महत्त्व जाणत चित्रकथींची निवडक चित्रे घेऊन शासनाची रंगीत दिनदर्शिका प्रसिद्ध केली. याचवर्षी हिंदी चित्रपट दिग्दर्शक मणी कौल यांनी याच ठाकरवाडीवर

डॉक्युमेंट्री फिल्म काढली. सखाराम मसगे यांनी दूरदर्शनवर पहिला चित्रकथीचा कार्यक्रम केला. हळूहळू दिवस बदलू लागले. वसंतराव गंगावणे, सखाराम मसगे यांच्या समवेत एक नवीन युवा कलाकार, गणपत मसगे हा या कलांचा आत्मियतेने अभ्यास करत होता.

ठाकर कलाकार म्हणून आमची छाती दोन इंच वर येते. हा सारा परिसर रसिकांना नक्कीच जीवाभावाचा होईल. तर मग चला, या ठाकर पुरातन कला आपल्या जीवनात आणूया. येथे येणाऱ्या तमाम रसिकांना विनंती आहे की, कला जगवायची असेल तर कलाकार जगवला पाहिजे.

- गणपत मसगे, ठाकर लोककलाकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT