forced Vasectomy operation on worker man in banda  
कोकण

टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याची केली बळजबरीने 'नसबंदी'...

सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) - नसबंदीचे प्रशासकीय टार्गेट पूर्ण करण्यासाठी पाडलोस-केणीवाडा येथील गवंडी कामगाराची बळजबरीने नसबंदी करून त्याच्या आरोग्याशी आरोग्य कर्मचार्‍यांकडूनच हेळसांड केल्याचा धक्कादायक प्रकार पाडलोस येथे उघडकीस आला आहे. पत्नीची नसबंदी शस्त्रक्रिया झालेली असतानाही पैशांचे आमिष दाखवून कुटुंबियांना अंधारात ठेवत प्रशांत अंकुश नाईक (वय ४०) यांची बळजबरी नसबंदी करण्यात आली. याबाबतचा तक्रार अर्ज त्यांची पत्नी प्रतिक्षा नाईक यांनी बांदा पोलीसांत दिला आहे. 
 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खालीफे यांनी तात्काळ मळेवाड आरोग्य केंद्राला भेट देत चौकशी केली.  या प्रकरणी   आरोग्य सेवक रामा आरोस्कर यांच्यावर तक्रार अर्जात आरोप आहे.

गरिबीचा फायदा घेत... 

 याबाबत तक्रार अर्जात नमुत  माहिती अशी की, पाडलोस येथील प्रशांत नाईक हे गवंडी व मोलमजुरीची कामे करून उदरनिर्वाह करतात. मंगळवार दिनांक २५ रोजी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी रामा आरोसकर, मळगाव येथील राणे नामक गृहस्थ व अन्य एक अनोळखी व्यक्ती यांनी प्रशांतला गाठले. गरिबीचा फायदा घेत त्यांनी प्रशांतला नसबंदी केल्यानंतर ४० हजार रुपये बँक खात्यात जमा होतील असे  सांगितले. प्रशांतची खात्री होण्यासाठी आरोसकर यांनी नाईक यांच्या घरी जात बँक पासबुक व आधार कार्ड यांची झेरॉक्स प्रत घेतली. यावेळी पत्नीने आरोस्कर यांच्याकडे कागदपत्रांबाबत विचारणा केली. बांधकाम केलेल्या मजुरीचे पैसे जमा करण्यासाठी कागदपत्रांची गरज असल्याचे सांगून नसबंदी शस्त्रक्रियेबाबत त्यांनी पत्नीला पूर्णपणे अंधारात ठेवल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

तिघाही जणांनी प्रशांतला प्रथम मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. काही कागदपत्रांवर त्याच्या सह्या घेऊन त्याला थेट शासकीय रुग्णवाहिकेतून कणकवली येथील खाजगी दवाखान्यात नेले. शस्त्रक्रिया  बिनटाक्याची न करता टाके घालून करण्यात आली.  असह्य वेदना असतानाही सायंकाळी प्रशांतला त्यांना दांडेली-आरोस बाजार येथे बाजारपेठेत सोडून तिघांनी तेथून पलायन केले.त्याचवेळी आपण फसलो गेल्याचे प्रशांत यांच्या लक्षात आले. मात्र त्यांनी याची घरच्यांना कल्पना दिली नाही. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवणावेळी रक्तस्राव होत असल्याचे प्रशांतची पत्नी प्रतीक्षा हिच्या लक्षात आले. अधिक विचारपूस केली असता प्रशांतने पत्नी व भावाला झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली.

अज्ञानाचा फायदा घेऊन पैशाचे आमिष दाखवून बळजबरीने शस्त्रक्रिया केल्याचा आरोप त्यांचा भाऊ विश्वनाथ यांनी बांदा पोलीसांसमोर केला. प्रशांत यांच्या पत्नीने बांदा पोलीसांत तक्रार अर्ज दिला आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशांत यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. टार्गेट पूर्ण करण्यासाठी केलेल्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.

 आरोग्य सेवकावर कारवाई होणार

पाडलोस येथील युवक प्रशांत नाईक यांच्यावर बळजबरीने नसबंदी शस्त्रक्रिया करणाऱ्या आरोग्य सेवकावर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खालीफे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, डॉ. संदीप कांबळे यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन माहिती घेतली. यावेळी आरोस्कर यांचेवर कारवाई करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले अशी माहिती मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकूर यांनी दिली.

   पाडलोस येथील तरुणावर झालेला हा प्रकार किळसवाणा न निंदनीय आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी किती टोकाला जाऊ शकतात हे यातून सिद्ध झाले. या प्रकाराबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खालीफे यांच्याशी बोलणे झाले आहे. जि. प. सदस्या तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्षा शर्वाणी गावकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांसमवेत गुरूवारी मळेवाड आरोग्य केंद्रात जाब विचारला जाईल. संशयितांवर तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे. 
     अक्रम खान, सरपंच-बांदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: ''बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही', पंकजा मुंडे असं का बोलल्या? भाजपचंच राजकारण की..?

Champions Trophy 2025: 'काहीही झालं तरी स्पर्धा दुसरीकडे हलवू देऊ नका' पाकिस्तान सरकारचे बोर्डाला आदेश

Rohit Pawar : महाआघाडीच्या १७० जागा येणार निवडून; ‘स्ट्राईक रेट रेकॉर्ड’ तोडणार : रोहित पवार

Sangli Pattern: 'लढा, नडा, पाडा’ नवी मुंबईत ‘सांगली पॅटर्न’ची चर्चा

Cherry Blossoms: भारतातील 'या' ठिकाणी घेऊ शकता 'चेरी ब्लॉसमचा' आनंद, फक्त 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT