Turtles in Guhagar Sea esakal
कोकण

Olive Ridley Turtles : गुहागर समुद्रात कासवाची 108 पिल्ले विसावली; तब्बल 10 हजार 538 अंड्यांचं संरक्षण

आतापर्यंत १०८ कासवाची पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

गतवर्षी किनाऱ्यावर २१९ गटामधून २३ हजार ७३ अंड्यांना संरक्षण दिले होते. त्यामधून ७ हजार ६८ कासव पिल्लांचा जन्म झाला होता.

गुहागर : गुहागर बाग व वरचापाट येथील समुद्रकिनारी (Guhagar Sea) ऑलिव्ह रिडले (Olive Ridley Tortoise) मादींच्या कासवांची १० हजार ५३८ अंडी सुरक्षित केली होती. या सुरक्षित केलेल्या अंड्यांमधून १०३ कासवाची (Turtle Eggs) पिल्ले बाहेर पडून समुद्राकडे झेपावली. आतापर्यंत १०८ कासवाची पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आली.

गतवर्षाप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात सर्वाधिक कासव संवर्धनाची मोहीम गुहागर समुद्रकिनाऱ्यावर राबवण्यात येत आहे. परिमंडल वनाधिकारी (Forest Officer Guhagar) गुहागरचे वनपाल संतोष परशेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अरविंद मांडवकर, संजय दुडंगे कासव संरक्षणाचे काम पाहत आहेत. किनाऱ्यावर एकूण सहा कासवमित्रांची नेमणूक केली आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ महिन्यापासून कासव अंडी सापडली होती. यावर्षी वादळसदृश परिस्थितीमुळे विणीचा हंगाम लांबला. १६ डिसेंबर २०२३ ला पहिले घरटे मिळून आले. किनाऱ्यावर बाग व वरचा पाट या ठिकाणी कासव अंडी संवर्धन केंद्र उभारली आहेत. यामध्ये आतापर्यंत १०० घरट्यांमध्ये १० हजार ५३८ कासव अंड्यांना संरक्षण दिले आहे.

४ फेब्रुवारीपासून संरक्षित केलेल्या अंड्यामधून पिल्ले बाहेर येण्यास सुरुवात झाली. या वेळी वनपाल संतोष परशेटे, वनरक्षक अरविंद मांडवकर, संजय दुंडगे, उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, सत्यवान घाडे, श्रीधर बागकर, कासवमित्र रवींद्र बागकर, कुसुमाकर बागकर आदी उपस्थित होते.

८,७७२ पिल्ले समुद्रात

गतवर्षी किनाऱ्यावर २१९ गटामधून २३ हजार ७३ अंड्यांना संरक्षण दिले होते. त्यामधून ७ हजार ६८ कासव पिल्लांचा जन्म झाला होता. तवसाळमध्ये २८ घरट्यांमधून ३ हजार २३९ अंड्यांना संरक्षण देत १७०४ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली होती. गतवर्षी सर्वाधिक २६ हजार ३१२ अंड्यांना संरक्षण देऊन त्यामधून ८ हजार ७७२ कासव पिल्ले समुद्रामध्ये सोडली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra CM : मुख्यमंत्री पदासाठी महाराष्ट्रात राबवला जाणार बिहार पॅटर्न ? जाणून घ्या कारणं

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Ayurveda Tips: 'या' दोन गोष्टी पाण्यात उकळून प्यायल्यास हृदयविकाराचा धोका होतो कमी

पुष्पा 2 चं बहुचर्चित Kissik आयटम सॉंग रिलीज ; श्रीलीलाच्या अदांसमोर समांथाही पडली फिकी

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तासभर चर्चा

SCROLL FOR NEXT