शिवसेनेत (Shiv Sena) १९८६ पासून कार्यरत असलेले सूर्यकांत यांच्यासमवेत दापोली व मंडणगडमधील त्यांचे समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही चर्चेतून पुढे येत आहे.
दाभोळ : दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी (Suryakant Dalvi) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या वृत्ताला भाजपच्या (BJP) वरिष्ठांकडून दुजोरा दिला गेला असून, लवकरच हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत मुंबईत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे; मात्र यावर माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.
शिवसेनेत (Shiv Sena) १९८६ पासून कार्यरत असलेले सूर्यकांत यांच्यासमवेत दापोली व मंडणगडमधील त्यांचे समर्थक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही चर्चेतून पुढे येत आहे. त्यामध्ये काही माजी सभापती तर काही विभागप्रमुख व अन्य पदाधिकारी आहेत. मुंबईमधूनही काहीजणं प्रवेश करणार आहेत.
याबाबत मुंबईतून युवानेते सर्वांच्या संपर्कात असल्याचे समजते. माजी आमदार दळवी हे संघटनेत वरिष्ठ असूनही त्यांना पक्षाचे नेते, उपनेते न केल्यामुळे व अन्य कनिष्ठ पदाधिकारी यांनाही पदे न दिल्यामुळे दळवी हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे समजते. दळवी यांनी आपल्या समर्थकांजवळ भाजपमध्ये जाण्याबाबत चर्चा केली असून, ते समर्थक तालुक्यात विविध भागांमध्ये असलेल्या ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना आपल्यासमवेत येण्यासाठी आग्रह करत आहेत. काही कार्यकर्ते हे त्यांच्यासमवेत जाण्यास इच्छुक नाहीत.
या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे माजी आमदार संजय कदम व दापोली आणि मंडणगड तालुक्यातील ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक खेड येथे झाली. या बैठकीत तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण पक्षासोबत असल्याचे सांगितले. दापोलीत सध्या या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली असून दळवी खरोखरच प्रवेश करणार की दरवेळीप्रमाणे फक्त चर्चाच रंगणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.