Sharad Pawar Supriya Sule Rajan Teli esakal
कोकण

Maharashtra Politics : चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांनी राज्यासाठी काय केलं? राजन तेलींचा सुप्रिया सुळेंना सवाल

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे तब्बल चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात ५३ वर्षे तुमचे सरकार होते, त्यावेळी किती जणांना नोकऱ्या दिल्या?

सावंतवाडी : राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचे वडील शरद पवार हे तब्बल चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. असे असताना त्यांनी राज्यासाठी आणि पर्यायाने कोकणासाठी काय केले? याचे उत्तर द्यावे, नाहक या ठिकाणी येऊन आमच्या नेत्यांवर टीका करू नये, असे प्रत्युत्तर माजी आमदार राजन तेली यांनी येथे दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही, मात्र याकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधले आहे, त्यामुळे निश्चितच चांगली सुविधा उपलब्ध होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दोडामार्ग येथे शुक्रवारी (ता. २७) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभेत खासदार सुळे यांनी भाजप नेत्यांवर टीका केली होती.

त्याचबरोबर जिल्ह्याला भेडसावणारे रोजगार, हत्ती प्रश्नाबाबतही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी तेली यांनी येथील आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी तेली म्हणाले, ‘‘तब्बल ५३ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे तब्बल चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. असे असताना त्यांनी राज्यासाठी आणि पर्यायाने कोकणासाठी नेमके काय केले, याचे उत्तर द्यावे.

येथील आरोग्य व्यवस्थेबाबत पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून मंत्रालयात तीन वेळा बैठक आयोजित करण्यात आली; मात्र या ठिकाणी डॉक्टर येण्यास तयार नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेची परिस्थिती म्हणावी तशी चांगली नाही. तंत्रज्ज्ञ भरून काहीअंशी सेवा देण्यासाठी येत्या काळात आम्ही प्रयत्नशील आहोत. जनतेला चांगली सेवा देऊन आरोग्याचा ‘बॅकलॉग’ भरून काढायचा असून, या संदर्भात पालकमंत्री चव्हाण यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनीही हा प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे येत्या काळात निश्चितच जिल्ह्यात चांगली आरोग्य सेवा मिळेल.’’

सत्ता असताना किती नोकऱ्या दिल्या?

मराठा आरक्षण राणे समितीकडून प्रयत्न झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला होता. उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले; मात्र सर्वोच्च न्यायालयात जेव्हा आरक्षण गेले, तेव्हा वकिलांची फौज उभी करण्याची गरज होती; परंतु तुमचे सरकार त्यामध्ये अपयशी ठरल्याने आरक्षण टिकले नाही, असा आरोप यावेळी तेली यांनी केला.

राज्यात ५३ वर्षे तुमचे सरकार होते, त्यावेळी किती जणांना नोकऱ्या दिल्या? ज्यांनी आपल्या जमिनी दोनशे रुपये गुंठा दराने दिल्या, त्या जमिनींमध्ये प्रकल्प का उभे राहू शकले नाहीत? सी-वर्ल्ड, पर्यटन जिल्हा, चिपी विमानतळ, आडाळी एमआयडीसी हे प्रकल्प नारायण राणे यांनी आणले, तुम्ही काय आणले? असा सवालही त्यांनी केला.

नीलेश राणेंच्या नाराजीबाबत मौन

दरम्यान, शिक्षणमंत्री केसरकर यांच्यावर खासदार सुळे यांनी केलेल्या टीकेबाबत तेली यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे नीलेश राणेंच्या नाराजीबाबत तेच उत्तर देतील, असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhal Masjid: काय आहे संबळच्या जामा मशिदीचा वाद ? सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार; तिघांचा मृत्यू तर दहाहून अधिक जखमी

Drugs Seized: भारतात हद्दीत आजवरचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडला! कोस्ट गार्डनं कुठं केली कारवाई? जाणून घ्या

Mumbai Indians Stratagy: १६ रिक्त जागा, २६ कोटी शिल्लक; मुंबई इंडियन्सने IPL Auction मध्ये नेमकं काय केलं अन् काय करायचं होतं?

Latest Maharashtra News Updates : स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी पुन्हा आंदोलन

BitCoin Roars: 20,00,00,000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न; बिटकॉइनमध्ये 10 हजार डॉलरची गुंतवणूक झाली 2048 कोटी डॉलर, गुंतवणूकदार झाले मालामाल

SCROLL FOR NEXT