Ganapatipule Sakal
कोकण

Ganapatipule News : गणपतीपुळे किनाऱ्यावरील ‘त्या’ भिंतींना धोका

श्रीक्षेत्र गणपतीपुळे किनाऱ्यावरील मंदिर परिसराला जोडून बांधलेल्या संरक्षण भिंतीचा काही भाग यंदाच्या पावसाळ्यात जोरदार लाटांच्या तडाख्याने कोसळला आहे.

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे किनाऱ्यावरील मंदिर परिसराला जोडून बांधलेल्या संरक्षण भिंतीचा काही भाग यंदाच्या पावसाळ्यात जोरदार लाटांच्या तडाख्याने कोसळला आहे. त्याची वेळीच दुरुस्ती झाली नाही तर पुढील पावसाळ्यात ती भिंत पूर्णतः कोसळून जाण्याची शक्यता आहे.

मेरिटाईम बार्डाच्यावतीने गणपतीपुळे किनाऱ्यावर गेल्या काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून स्वच्छतागृह इमारत ते शासकीय विश्रामगृह इमारत ते मंदिर परिसरात संरक्षण भिंत बांधण्यात आली. या भिंतीला पायऱ्या बांधण्यात आल्यामुळे पर्यटकांना बसण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. सूर्यास्त पाहण्याचा आनंद या पायऱ्यावरून पर्यटक घेतात. विश्रामगृह ते मंदिर परिसराकडे जाणाऱ्या संरक्षण भिंतीचा काही भाग यंदाच्या पावसाळ्यात जोरदार लाटांमुळे कोसळला आहे.

या संरक्षण भिंतीच्या पायऱ्या तुटल्या आहेत. त्यामुळे ये-जा करणाऱ्या पर्यटकांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. मेरीटाईम बोर्डाने या भिंतीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, मागील वर्षी गणपतीपुळे किनारी अचानक आलेल्या मोठ्या लाटेने अऩेक व्यावसायिकांचे नुकसान झाले होते. या संरक्षक भिंतीमुळे किनाऱ्यापासून थोडी बाहेरील बाजूला असलेल्या टपऱ्या, हातगाड्यांना लाटेचा तडाखा जाणवला नाही. लाट बंधाऱ्यावर आपटल्यामुळे तीव्रता कमी झाली आणि अनर्थ टळला. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी संरक्षक भिंत उभारणे गरजेचे आहे, अशी मागणी पर्यटकांकडूनही केली जात आहे.

किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना बसण्यासाठी तिथे भिंत बांधण्यात आली आहे. त्याची वेळीच डागडुजी करणे गरजेचे आहे अन्यथा पुढील पावसाळ्यात पूर्णतः भिंत कोसळून जाईल.

- कल्पेश सुर्वे, गणपतीपुळे

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

Nashik Police : मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा तैनात; सशस्त्र आयटीबीपीची करडी नजर

SCROLL FOR NEXT