International Tourist Destination Ganpatipule Ratnagiri esakal
कोकण

Ganpatipule: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील व्यापाऱ्यांना नोटीसा; ग्रामपंचायत आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

Ganpatipule: रत्नागिरी तालुक्यातील ग्रामपंचायत गणपतीपुळे कार्यक्षेत्रातील सर्व्हे नंबर दोन समुद्रकिनारी व्यापाऱ्‍यांचे अतिक्रमण वाढत आहे. याबाबत स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्या आहेत. यापुढे ग्रामपंचायत कधीही कारवाई करेल, अशा सूचना या नोटीसमधून देण्यात आली आहे.

गणपतीपुळे कार्यश्रेक्षातील सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करणाऱ्‍यांना 23 नोव्हेंबर रोजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचाऱ्‍यांनी प्रत्यक्ष भेट दिली. एकाच व्यक्तीचे एकापेक्षा जास्त असलेले व्यवसाय, तसेच व्यवसायाच्या ठिकाणी कामगार असलेले व्यवसायधारक, ग्रामपंचायतीचा व्यवसाय कर थकवणारे व्यवसायधारक, फ्री झोनचे उल्लंघन करणाऱ्या व्यवसाय धारकांवर ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात येणार असल्याच्या सूचनांचा यामध्ये समावेश आहे.

त्यानुसार कारवाई दरम्यान संबंधित सूचनांचे उल्लंघन करणाऱ्‍या व्यावसायिकांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे कोणतीही पूर्वसूचना न देता दिवसा किंवा रात्री केव्हाही कारवाई करण्यात येईल

अशाप्रकारची जाहीर नोटीसाचा फलक गणपतीपुळे समुद्रकिनारी ग्रामपंचायतीने लावला आहे. त्यामुळे समुद्रकिनारी व इतर सार्वजनिक ठिकाणच्या सर्वच व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या एक-दोन वर्षापासून गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्‍यावर असलेल्या सर्वच व्यवसायांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.

तसेच व्यवसायांच्या ठिकाणी परप्रांतीय कामगारांचे प्रमाणही वाढल्याने स्थानिक व्यावसायिकांना व्यवसाय करणे कठीण होऊन बसले आहे. या ठिकाणी वाढलेले अतिक्रमण कमी व्हावे, या उद्देशाने गणपतीपुळे येथील काही स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायतीला वारंवार कळविले होते.

मात्र याबाबत कुठलीही कारवाई झालेली नव्हती. मात्र काही दिवसांपूर्वी गणपतीपुळे येथील प्रमुख ग्रामस्थांनी एकत्रित येऊन गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्‍यावर वाढलेले अतिक्रमण कमी करावे, यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडे जोर धरला होता. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये संबंधित ग्रामस्थांनी लावून धरलेल्या मागणीचा विचार करून गणपतीपुळेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

SCROLL FOR NEXT