कोकण

दापोलीतील नदीत कचरा

CD

१९ (टूडे ३ साठी, संक्षिप्त)

दापोलीतील नदीत कचरा

दाभोळ ः दापोली शहरातून वाहणाऱ्या जोग नदीत कचरा न टाकण्याचे आवाहन करूनही नदीत प्लास्टिक व इतर कचरा टाकला जात आहे. नगरपंचायतीकडून या नदीची वेळोवेळी साफसफाई करण्यात आल्यानंतरही दोन दिवसात कचरा दिसतो. हा कचरा पावसाळ्यात वाहत समुद्रात जातो आणि तेथील सागरी जीव धोक्यात येतात. काहीवेळा प्लास्टिक व इतर कचरा नदीत अडकून राहिल्यास पाणीपातळी वाढते आणि नदीकिनारी असलेल्या गावांवर पुराची आपत्ती ओढवते. याबाबत दापोली नगरपंचायतीकडे संपर्क साधला असता काही दिवसांपूर्वी जोग नदी साफसफाई करण्यात आली होती; परंतु साफसफाईनंतर लगेच नागरिक पुन्हा कचरा टाकला जात असल्याचे सांगण्यात आले. जोग नदीत कचरा टाकू नये, असे आवाहन करून देखील नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दापोली तालुक्यातील नद्या, ओढे यामध्ये प्रचंड प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. जोग नदीतही प्लास्टिक कचरा टाकला जातो. अशा प्रकारे नदीत कचरा टाकणाऱ्यांवर नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

----------
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
शिक्षावर्गाचा उद्या समारोप

चिपळूण ः शहरातील युनायटेड इंलिश स्कूल येथे गेले १३ दिवस सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांताचा संघ शिक्षावर्गाचा समारोप कार्यक्रम उद्या (ता. ८) सायंकाळी ६.०५ वा. होणार आहे. २४ मे ते ९ जूनदरम्यान या संघ शिक्षावर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिक्षावर्गामध्ये २७५ स्वयंसेवक प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झाले आहेत. १५ दिवस पूर्ण वेळ युनायटेड इंग्लिश स्कूल येथे ते राहतात. प्रत्येक दिवसाचे सकाळी ५ ते रात्री १०.३० वा. पर्यंतचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी यातील प्रशिक्षणार्थींचे चिपळूण शहरात संचलन झाले तसेच गुरूवारी वर्गभेट हा अनोखा कार्यक्रमही पार पडला तर ८ जूनला संघ शिक्षावर्गाचा समारोप होणार आहे. या वेळी वर्गात झालेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक विद्यार्थी सादर करणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उत्तर रत्नागिरी जिल्हा संघचालक सतीश टोपरे, सर्वाधिकारी डॉ. अच्युत पाल, जिल्हा कार्यवाह विश्वास गोंधळेकर, जिल्हा सहकार्यवाह हिराचंद आयरे, जिल्हा प्रचारक अमित पाल, संपर्क विभागप्रमुख मंदार लेले यांनी केले आहे.
------

खेड-समर्थनगरमध्ये
नवे डम्पिंग ग्राऊंड

खेड ः शहरातून दिवसाकाठी गोळा होणाऱ्या कचऱ्याची समर्थनगर येथे प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जात आहे. धुमसणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम असतानाच येथे नव्या डम्पिंग ग्राउंडची निर्मिती झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. समर्थनगर येथे रस्त्यालगत ट्रॅक्टरद्वारे इमारतींमधील चिखल व कचरा आणून टाकला जात असल्याने रहिवासी पुन्हा आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. खेड शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना नगरप्रशासनाला कसरत करावी लागत आहे. एकीकडे कचरा प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडलेले असतानाच दुसरीकडे नगर पालिका समर्थनगर येथेच कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे; मात्र समर्थनगर येथे कचऱ्याची विल्हेवाट लावताना संबंधित ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा रहिवाशांना मोठा फटका बसत आहे. बऱ्याचवेळा मोजकेच दिवस येथे येऊन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्योन सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे याशिवाय याच ठिकाणी कचरा जाळल्याने नजीकच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
----------------
- rat७p२.jpg-
२४M८८५७९
संजीवन गुरूकुलमध्ये वृक्षारोपण करताना पालक, शिक्षक.


संजीवन गुरूकुलमध्ये
वृक्षारोपण कार्यक्रम

रत्नागिरी ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पटवर्धन हायस्कूलच्या गुरूकुल विभागात हरितसेनेमार्फत वृक्षारोपण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष साळवी, पटवर्धन प्रशालेचे पर्यवेक्षक कोत्रे तसेच गुरूकुलच्या प्रबंधक नाईक, गुरूकुलमधील सर्व शिक्षक व आठवी आणि दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी गुरूकुलचे पालक विनोद प्रभुदेसाई यांनी आपल्या नर्सरीतील आवळा, सोनचाफा, पेरू, पपया आणि बुशमिरी ही झाडे दिली तसेच विद्यार्थ्यांनी तुळस, मोगरा अशी अनेक झाडे आणली होती. गुरूकुलच्या बागेमध्ये ही सर्व झाडे लावण्यात आली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष साळवी यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
-------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT