तापमान वाढीमुळे उष्णतेच्या गंभीर लहरी, अतिवृष्टी, अनियमित पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट, पुर अशी अनेक संकटे भविष्यात निर्माण होणार आहेत.
वैभववाडी : हवामान बदलामुळे गेल्या काही वर्षांत विविध नैसर्गिक संकटांनी मेटाकुटीस आलेल्या कोकणातील (konkan agriculture) हजारो फळबागायतदारांना नव्या जागतीक तापमानवाढीच्या शक्यतेने झटका बसला आहे. पुढील २० वर्षांत दीड अंश सेल्सीयसने तापमानवाढ होणार असल्यामुळे कोकणातील हजारो हेक्टरवर असलेल्या फळबागा टिकविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे आहे. त्यामुळे आता हवामान बदलानुसार (climate change) पीकपद्धतीत बदल करण्याच्या टप्प्यावर संपुर्ण कोकण उभा आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या (united nations) इंटरगर्व्हरमेंटल पॅनल अॅण्ड क्लायमेंट चेंजने पुढील दहा ते वीस वर्षातील जागतिक तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. साधारणपणे वीस वर्षात दीड अंश सेल्सीयसने तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज दिला आहे. याशिवाय समुद्राच्या पाणीपातळीत देखील वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. तापमान वाढीमुळे (global warming) उष्णतेच्या गंभीर लहरी, अतिवृष्टी, अनियमित पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट, पुर अशी अनेक संकटे भविष्यात निर्माण होणार आहेत. इतकेच नाही तर त्यानंतर आणखी काही वर्षानंतर तापमानात २ अंश सेल्सीयसने वाढ होण्याचा संभाव्य धोका निर्माण होणार असल्याचे स्पष्ट केले.
कोकणात गेली काही वर्ष सातत्याने हवामान बदल होताना दिसत असुन त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागत आहे. त्यामुळे भविष्यातील तापमान वाढीत कोकण अर्थात सिंधुदुर्ग जिल्हा (sindhudurug district) होरपळणार हे निश्तिच आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाचे अर्थकारण फळबागांवर आहे. आंबा, काजु, नारळ, सुपारी, कोकम, सुपारी आणि मसाल्याची अनेक पिके कोकणात घेतली जातात. यातील देवगड हापुस जगभरात प्रसिध्द आहे. किनारपट्टीच्या अनेक तालुक्यांतील बहुतांशी शेतकर्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधनच हापुस बनला आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात काजुची उलाढाल देखील बाराशे ते पंधराशे कोटीवर पोहोचली असुन जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये काजुचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.
नारळ आणि सुपारीचा झोन देखील जिल्हयात आहे; परंतु गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील सर्व प्रमुख फळपिकांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागला. फयाणपासुन अगदी तौक्तेपर्यत आलेल्या वादळांमध्ये अनेक फळबागायतदार उद्ध्वस्त झाले. त्यातच आता आणखी तापमान वाढणार असल्यामुळे बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे ज्या कोकण आणि सिंधुदुर्गचे अर्थकारण फळबागायतीवर अवलंबुन आहे. भविष्यात त्या फळबागा टिकविण्याचे मोठे आव्हान येथील बागायतदार समोर असणार आहे.
जिल्ह्यात १ लाख ३० हजार हेक्टरवर उत्पादनक्षम फळपिके आहेत. नैसर्गिक संकटामुळे सतत नुकसान होणार असेल तर या फळबागांचे करायचे काय असा प्रश्न आता बागायतदारासमोर उभा आहे. बदलत्या वातावरणामुळे संपुर्ण जिल्हा आता पीक पद्धतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. बदलत्या वातावरणाचा अभ्यास करूनच येथील शेतकऱ्याला पुढचे पाऊल टाकावे लागणार आहे.
कोकणात २०१०-११ पासून हवामान बदलाचे परिणाम दिसत आहेत. २०११ मध्ये देवगड तालुक्यातील तापमान काही दिवस ११ सेल्सीयस इतके राहिले. त्याचा परिणाम म्हणुन आंब्याला आलेल्या मोहोराची लांबी मोठी आली; परंतु कालांतराने या मोहोराला अगदी नगण्यच फळधारणा झाली. हवामान बदलाचा तो परिणाम होता. हे अभ्यासअंती लक्षात आले. याशिवाय उन्हाळ्यात देखील प्रत्येक महिन्यात पाऊस पडतो हा बदलच आहे. फळपिकांवर हवामान बदलाचा परिणाम मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यात कोकणात पीक पद्धतीत बदल करावा का? याचा विचार गरजेचा आहे.
- डॉ. विजय दामोदर, प्रभारी अधिकारी, आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर (ता.देवगड)
अतिवृष्टी, कमी होत चाललेली थंडी यासह हवामानात होत असलेले बदल काजू पिकाला अडचणीत आणणारे आहेत. तिनही ऋतुवरच काजू पिकांचे भवितव्य अवलंबुन असते. त्यातील एकामध्ये जरी बदल झाला तरी त्याचा पालवी, मोहोर आणि फळधारणेवर परिणाम होतो. बदललेल्या वातावरणामुळे विविध कीडरोगांचा देखील प्रमाण वाढते. परिणामी काजुबागा टिकविणे अवघड जाते. त्यामुळे या बदललेल्या हवामानाचा काजू बागांना पर्यायाने काजू बागायतदारांना मोठा फटका बसणार आहे.
- प्रा. विवेक कदम, काजुचे अभ्यासक, कृषी महाविद्यालय, सांगुळवाडी
...तर हा परिणाम शक्य
*वीस वर्षांत दीड अंश सेल्सीयसने तापमानवाढ शक्य
*सिंधुदुर्गातील फळबागायतदारांसाठी धोक्याची घंटा
*आंबा, काजू, सुपारीला सर्वाधिक धोका
*पीक पद्धतीत बदलाची गरज
*किनारपट्टी असलेल्या जिल्ह्याना बसणार अधिक फटका
*अतिवृष्टी, वादळ, पुर, गारपीट, उष्ण लहरी या संकटांची शक्यता
*आंबा, काजुवरील कीडरोगांचे प्रमाण देखील वाढणार
पीक लागवडीचे क्षेत्र हेक्टरमध्ये
आंबा ३० हजार ३५९
काजू ७२ हजार ७५५
नारळ १८१८१
सुपारी ११४६
मसाला पिके १२५६
चिकु २०१
इतर पिके २८१५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.