हर्णे : सरकारने अवैध मासेमारी विरोधात जो कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी वेळेतच होणे गरजेचे आहे. अन्यथा समुद्रात आमच्यातच राडे आणि मारामारी होण्याची शक्यता आहे ; असे हर्णे बंदरातील दुर्घटनाग्रस्त हेमंत चोगले यांनी सांगितले.
परराज्यातील फास्टर नौका आणि रायगड जिल्ह्यातील उत्तन येथील नौकांनी हर्णेच्या समुद्रमध्ये मासेमारीचा धुडगूस चालू केला आहे. परंतु फास्टर नौकांनी मात्र खूपच हैराण करून सोडलंय. हर्णे बंदरातील पारंपरिक नौका तेवढ्या क्षमतेच्या नसल्यामुळे या फास्टर नौकांसमोर काहीच ठावठिकाणा लागत नाही.
कारण २५ डिसेंबर २०२१ या दिवशी हेमंत चोगले यांच्या नौकेला जबर धडक देऊन किमान एक लाखाचे नुकसान केले. याबाबत हेमंत चोगले यांनी सांगितले की, २४ तारखेला रात्री ८ वाजता माझी मासेमारीकरिता गेलेली नौका बंदरात आली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबर २०२१ या दिवशी सकाळी बाजारात मासळी उतरून पुन्हा समान भरून मासेमारीला गेली त्याचदिवशी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास माझ्या नौकेला एका अज्ञात मोठ्या नौकाने जोरदार धडक दिली. ही नौका फास्टर नौका होती का दुसरी कोणती होती ते आमच्या खलाशांना समजू शकले नाही कारण तेवढ्याच वेगाने ते पशार झाले. माझी नौका फायबर केलेली होती म्हणून वाचली अन्यथा तिथेच जलसमाधी मिळाली असती. जोरदार धडक बसल्याने नौकेचा काठाचा व मधलाच फायबरचा भाग आतल्याआत तुटला त्यामुळे किमान एक लाखाचे नुकसान झालेच आणि नौकेचे काम करण्यासाठी म्हणून नौका बंद ठेऊन मासेमारी देखील बंद राहिली. हे नुकसान झालेलं कोण भरून काढणार ?
या फास्टर नौकांनी खूपच दादागिरी सुरू केली आहे. पाजपंढरी येथील गोवर्धन पाटील , सुरेश चोगले आदी बऱ्याच मच्छीमारांच्या जाळीचे नुकसान केले आहे. कुणाचं ५० हजार तर कुणाचं एक लाखाच अस नुकसान आम्हा मच्छीमारांना सहन कराव लागत आहे. याला सर्वस्वी जबाबदार सरकारच आहे .
सरकारने या अवैध मासेमारी विरोधात केलेल्या कायद्याची योग्य अमलबजावणी करणे नितांत गरज आहे. अशी मी कळकळीची विनंती करतो आहे. अन्यथा समुद्रातच मारामारी आणि राडे व्हायला वेळ लागणार नाही; असा इशारा येथील दुर्घटनाग्रस्त हेमंत चोगले यांनी दिला आहे.
हर्णे बंदरातीलच गोवर्धन पाटील यांची जाळीच या फास्टर नौकांनी तोडून टाकली. यावेळी गोवर्धन पाटील यांनी सांगितले की, २४ डिसेंबर ला आम्ही समुद्रात मासेमारी करत होतो. आमच्या आजूबाजूला फास्टर नौका भरपूर प्रमाणात मासेमारी करत होत्या. आम्ही मासळी पकडण्यासाठी जाळी टाकली होती परंतु या फास्टर नौकांनी काहीही न पाहता खूप वेगाने आले आमची जाळी तोडून थेट वेगाने पळून गेले माझं किमान ५० हजार रुपयांच नुकसान झालं आहे. यावर शासन काहीच करत नाही. आम्हाला कोणीही वेळीच नाही अशी व्यथा पाटील यांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.