काम बंद आंदोलनामध्ये सामील झालेले जिल्हा हिवताप कर्मचारी sakal
कोकण

हर्णे : शासकीय हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

हर्णे : सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांवर शासनाने अन्याय केल्यामुळे आज ता.१४ डिसेंबर पासून विभागातील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू करणार आहेत. हिवताप विभागासाठी असलेले जुने सेवाप्रवेश नियम २९ सप्टेंबर २०२१ रोजी नवीन अधिसूचना काढून रद्द केले आहेत. आरोग्य सेवक या पदासाठी पूर्वी दहावी शैक्षणिक पात्रता असताना ती आता बारावी विज्ञान करण्यात आली आहे, आरोग्य सहाय्यक या पदासाठी आरोग्य सेवक या संवर्गातून पदोन्नतीने देण्याचे पद असूनही सहाय्यक पदाची शैक्षणिक पात्रता विज्ञान पदवीधर करण्यात आली आहे.

आरोग्य पर्यवेक्षक हे पद प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आरोग्य सहाय्यक या कोट्यातून भरावयाचे पडत असूनही त्यासाठीही शैक्षणिक पात्रता विज्ञान पदवीधर व आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रम अशी करण्यात आली आहे. जुन्या सेवाप्रवेश नियम द्वारे राज्यात कार्यरत असलेले क्षेत्र कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय अधिकारी या पदांना पदोन्नतीसाठी अशा जाचक नियमांमुळे अडचण तयार झाली आहे. तसेच आश्वासित प्रगती योजना मिळण्याचा मार्ग संपला आहे. कोरोना काळापासून हिवताप विभागाचे कर्मचारी इतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना बरोबर काम करीत असून शासनाने त्यांच्यावर अन्याय केला आहे.

जुने सेवा प्रवेश नियम रद्द झाल्यानंतर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य पातळीपर्यंत निवेदने देण्यात आली असून त्याची दखल अजूनही शासनाने घेतलेली नाही त्यानंतर अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन, आक्रोश आंदोलने करण्यात आली असून आपले दुरावून घेतलेले अधिकार सर्वस्वी परत मिळविण्याचा निश्चय कर्मचाऱ्यांनी केला असून आज ता. १४ डिसेंबर पासून हिवताप विभागातील सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन सुरु करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य सरचिटणीस श्री डी एस पवार, रत्नागिरी जिल्हा हिवताप कर्मचारी निर्मूलन संघटना अध्यक्ष श्री डी डी कदम, उपाध्यक्ष स्वप्निल जोशी, सरचिटणीस श्री एस एस कांबळे, कोषाध्यक्ष श्री एस बी कुवळेकर संघटनेचे इतर पदाधिकारी यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स 495 अंकांनी खाली, निफ्टी 24,750 वर

Latest Maharashtra News Updates : समीर वानखेडे आगामी विधानसभा निवडणूक धारावीतून लढणार नाहीत

Diwali 2024 : दिवाळीसाठी या छोट्या गोष्टी वापरून घरीच बनवा आकाशकंदील, हे ट्रेंडी डिझाईन्स नक्की ट्राय करा

Thane News: विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल; ठाणे महानगर पालिकेच्या शाळेतील किळसवाणा प्रकार

Nanded Lok Sabha by Election: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला! 'या' बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT