चिपळूण (रत्नागिरी) : राजकारणात संघटना चालवताना रिमोट कंट्रोल एकाकडे ठेवावाच लागतो. एकहाती निर्णय घेतल्याने खेर्डीच्या राजकारणात गेल्या २० वर्षांत अनेकांना सरपंचपदाची संधी मिळाली. कार्यकर्ते पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यदेखील झाले. संघटनेतून जे मोठे झाले तेच निष्क्रिय असलेल्या विरोधकांना मिळाले. त्यांनी पाणी योजनेत घाणेरडे राजकारण करून काम थांबवले. पाणी योजना ही खतातेंच्या हितासाठी नसून गावाच्या फायद्याची आहे, असे मत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आणि सुखाई परिवर्तन पॅनेलचे प्रमुख जयंद्रथ खताते यांनी व्यक्त केले.
खेर्डीतील विरोधकांनी वारंवार केलेल्या आरोपांवर जयंद्रथ खताते यांनी सर्व बाबींचा सविस्तरपणे खुलासा केला. ते म्हणाले, खेर्डीतील ग्रामस्थ व पोलिस दलातील कर्मचारी अप्पा दाभोळकर यांनी कोविड काळात शासकीय सेवेतील नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, तक्रारींची प्रशासनाने साधी दखल घेतली नाही. अप्पा दाभोळकर खेर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात प्रचार करत आहेत.
गावासाठी महत्त्वाचा दुवा असलेली नळपाणी योजना व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, ही नळपाणी योजना बंद पाडण्याचे विरोधी दाभोळकर गटाने केले. आता मात्र आम्ही ही पाणी योजना सुरू करू करणार असल्याचे विरोधक सांगतात. यावरून विरोधकांची दुटप्पी भूमिका दिसते.
आम्ही गावचा विकास केला नाही अशी बोंब विरोधकांकडून केली जाते. गावाचा विकास केला नसता तर खेर्डीतील जनतेने आम्हाला २० वर्ष जनसेवा करण्याची संधी दिली नसती. एकाधिकारशाहीबाबत म्हणाले, एकाधिकारशाही गावाच्या विकासासाठी होती. सर्वांना विश्वासात घेत निर्णय घेतल्यानेच २० वर्षे सत्ता राहिली, विकासाची कामे झालीत. खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून खेर्डीच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला. आम्ही पूर्वीचे सहकारी आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहोत. जनतेच्या दरबारात आम्ही जात आहोत. खेर्डीतील सुज्ञ जनता विकासासाठी आमच्या बाजूने उभी राहील.
हेही वाचा - दुचाकी दुरुस्तीतीतून करीअरची इंजिन मजबूत: कोल्हापूरच्या शिवानीचे आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल -
साळवींनाही सरपंचपद द्यायचे नव्हते
माजी सरपंच जयश्री खताते यांच्यावर अविश्वास दाखल करण्यापूर्वीच त्या राजीनामा देणार होत्या. पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे यांना तसे सांगितलेही होते. तरीही राजीनामा देण्यापूर्वीच अविश्वास दाखल केला. प्रकाश साळवी यांना सरपंचपद देण्यासाठी अविश्वास नाट्य घडवले; परंतु साळवी यांनाही ठसाळे व दाभोळकरांना सरपंच करायचे नव्हते. साळवींचा फक्त त्यांनी वापर केला आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.