वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ग्रामीण भागातील तळागाळात पोहचावा, यासाठी गाव तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यालयाची स्थापना करण्यासाठी पक्ष नोंदणी व बुथ नोंदणीचा संकल्प हाती घेतला आहे. ग्रामीण भागात लागलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाआघाडीतील सामिल पक्षाने एकत्रितपणे लढवाव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य कृष्णा चमणकर यांनी केले.
येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मेळाव्यात श्री. चमणकर बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल, ओबीसी सेलचे बाळ कनयाळकर, उपाध्यक्ष श्याम सूर्याजी, डॉक्टर सेलचे अध्यक्ष संजिव लिगवत, जिल्हा सेवादलचे अध्यक्ष धर्माजी बागकर, जिल्हा सरचिटणीस दिपक नाईक, वाहतुक सेलचे अध्यक्ष शिवाजी घोगळे, जिल्हा चिटणीस मकरंद परब, महिला तालुकाध्यक्ष दिपिका राणे, युवती कार्याध्यक्ष संपदा तुळसकर, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, उपाध्यक्ष बावतीस डिसोझा, जिल्हा कार्यकारिणी सदस्य पांडुरंग मेस्त्री, उत्तम सर्फराज, आंबा व्यापारी नितीन कुबल, व्यावसायिक चंद्रकांत साळगांवकर, प्रणाली चमणकर उपस्थित होते.
1 जानेवारी 2021 पासून रितसर पक्ष नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रसाद चमणकर यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्त्यांनी गावाचा विकास करण्यासाठी एकत्र येऊन महाआघाडी मित्रमंडळाच्या जोरावर जिंकताना जाती-वाद पसरविणाऱ्यांना निवडणूकीत जनतेने थारा देऊ नये असे आवाहन दिपक नाईक यांनी केले. आरवली व सागरतिर्थ येथे होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचा आढावा घेण्यासाठी आरवली गावासाठी दिपक नाईक आणि दिपिका राणे तर सागरतिर्थ गावासाठी निरिक्षक म्हणून मकरंद परब व संपदा तुळसकर यांची निवड केली असल्याची माहिती अमित सामंत दिली. शरद पवार हे आमचे दैवत असून आम्ही नेहमी त्यांच्यासोबतच राहणार आहोत. सत्तेसाठी उड्या मारण्याचा आमचा धंदा नसल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.