guhagar beach yellowish waves information by mayuresh patankar 
कोकण

कोकणात पिवळ्या लाटांनी होतेय सोनेरी पहाट

मयूरेश पाटणकर

गुहागर (रत्नागिरी)  : आजपर्यंत येथील समुद्रकिनाऱ्यावर रात्री दिसणाऱ्या निळ्या लाटांची चर्चा सुरू होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून येथे सकाळच्या वेळेत पिवळसर लाटही दिसत आहे. निळ्या लाटांपेक्षाही दिवसा दिसणाऱ्या या पिवळ्या लाटेचे प्रमाण खूपच कमी असले तरी याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. 


डिसेंबर महिन्यात रात्री भरतीच्या वेळी फ्लुरोसंट निळ्या लाटा गुहागरच्या समुद्रावर दिसतात. अनेकांनी याचा अनुभव घेतला. समुद्रावर अंधाऱ्या परिसरात उभे राहिले तर चमकणाऱ्या लाटा आजही पाहता येतात. या लाटा सूक्ष्म प्लवंगांचे पाण्याबरोबर घर्षण झाल्यानंतर प्लवंगांमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशामुळे प्रकाशमान होतात. त्या निळसर दिसतात. 

दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसांपासून सकाळच्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर सूर्यकिरणे येण्याआधी समुद्राच्या लाटा चमकताना दिसत आहेत. या लाटांचा रंग फ्लुरोसंट पिवळा दिसतो. रात्री दिसणाऱ्या लाटांच्या संख्येपेक्षा पिवळ्या लाटांचे प्रमाण कमी आहे. तासाभरात एखादी लाट चमकताना दिसते. "मॉर्निग वॉक'साठी येणाऱ्या लोकांच्या नजरेत ही पिवळी लाट आली. यावेळी हा प्लवंग असेल असे लक्षात आले नाही. समुद्रातील ऑइलमुळे पाण्याचा रंग बदलला असेल असे वाटले. परंतु दोन दिवस समुद्राचे निरीक्षण केले असता एखादी लाट क्षणार्धात पिवळी होत असल्याचे लक्षात आले. 
 
पिवळी लाट प्लवंगामुळेच तयार होत आहे. आम्ही मांडवीतील समुद्रकिनाऱ्यावरून काही प्लवंगांचे नमुने असलेले पाणी तपासण्यासाठी आणले. ते पाणी हलवल्यावर देखील भांड्याच्या कडेला हिरवट पिवळा थर दिसत होता. प्रखर सूर्यप्रकाशात प्लवंगाचा उजेड दिसू शकत नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेत काही वेळा कोट्यवधी प्लवंगांचा थर एकत्र जमा झाला असेल तर पाण्यासोबत होणाऱ्या घर्षणामुळे लाट हिरवट पिवळी दिसू शकते. 
- प्रा. स्वप्नजा मोहिते, समुद्री जीवांच्या अभ्यासक 

संपादन-अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT