Hapus Season Delayed Due To Storm Sindhudurg Marathi News  
कोकण

हापूसचा काढणी हंगाम लांबल्याने काय होणार परिणाम ? कशावर राहणार लक्ष ?

भूषण आरोसकर

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - प्रतिकूल हवामान स्थितीमुळे यंदाचा आंबा काढणी हंगामही लांबणीवर पडणार आहे. साधारण 15 एप्रिल दरम्यान हा हंगाम सुरू होण्याची चिन्हे असून एकाच टप्प्यात हाती आलेल्या आंबा पिकाची आवक स्थानिक बाजारपेठेपेक्षा परदेशातील निर्यातीकडे वळणार आहे.

निर्यातीसाठी याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी स्थानिक बाजारपेठेतील अर्थकारण मात्र आंबा पिक हाती किती येते यावरच अवलंबून आहे. आंबा पिकाची फळधारणा, आंबा काढणी प्रक्रिया आणि मान्सूनचे आगमन या गोष्टीवर आता बागायतदारांचे लक्ष राहणार आहे. 

मॉन्सूनचा दीर्घ मुक्काम, थंडीचा परिणाम

दरवर्षी साधारण जानेवारी दरम्यान किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आंबा काढणीचा हंगाम सुरू होतो; मात्र यंदा क्‍यार वादळाने संपूर्ण राज्याला दिलेला जोरदार फटका पाहता यावर्षी उशिरापर्यंतच्या पावसाने थंडीचे आगमनही उशिरा झाले. यंदाच्या हवामानाच्या सततच्या बदलामुळे हापूस हंगाम संकटात आला आहे. हापूसच्या बाबतीचा विचार करता मॉन्सूनचा दीर्घ मुक्काम आणि त्यातच मोहर येण्याच्या वेळेत झालेला अवकाळी पाऊस शिवाय थंडीही लांबली. त्यामुळे पुन्हा मोहोर येण्याच्या प्रक्रियेत आंबा हंगाम रखडला. यामुळे बागायतदारांना थंडी आणि चांगला मोहोर येण्याची प्रतिक्षा होती; मात्र तसे झाले नाही.

एक ते दीड महिने हंगाम लांबणीवर

सुरुवातीला 20 ते 25 दिवसांचा कालावधी वाटत असताना तब्बल एक ते दीड महिने हा हंगाम लांबणीवर पडला. त्यातच या आठवड्यात कुठेतरी थंडीची चाहूल लागल्याने आंबा पिकाला पालवी फुटत आहे. या गोष्टीने बागातदार सुखावला तरी आता आंबा पिकाची फळधारणा तसेच आंबा काढणी प्रक्रिया आणि मॉन्सूनचा हंगाम या गोष्टीवर आता बागायतदारांचे लक्ष लागून राहणार आहे. आंबा पिकाला नुकतीच पालवी फुटत असल्याने जानेवारी दरम्यान तसेच फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या काढणी प्रक्रियेला तब्बल दीड ते दोन महिन्यांचा कालावधीने उशीर होणार आहे, अशी मोठी शक्‍यता आहे. त्यानंतर आंबा स्थानिक बाजारपेठ तसेच निर्यातीसाठी रवाना होणार आहे.

बागायतदार वाशी मार्केटकडे आंबा वळवण्याची शक्यता

स्थानिक बाजारपेठेत दाखल होणारा आंबा हा एकाच टप्प्यात येणार असल्याने त्याचा परिणाम निश्‍चितच दर विक्री व खरेदी यावर दिसून येणार आहे. दरवर्षी साधारण 15 ते 20 दिवस आंबा पिकाला उशीर होत असला तरी सुरूवातीला हापूसला बाजारपेठेत चांगला दर असतो. चांगल्या दराने खरेदी विक्रीची स्थिती स्थानिक बाजारपेठेत अधिक काळ स्थिर राहते. काही कालावधीने टप्प्याटप्प्याने दर उतरणीकडे येतो. या वेळची स्थिती पाहता यंदा बाजारपेठेत चांगल्या हापूस आंब्याचा दराचा कालावधी स्थानिक बाजारपेठेत अधिक काळपर्यंत स्थिर राहणार, अशी शक्‍यता कमीच आहे. परिणामी बाजारपेठेत एकाच टप्प्यात आलेला चांगल्या दर्जाचा हापूस हा निर्यातीकडे वळण्याची शक्‍यता जास्त दिसून येत आहे. यातच दुसरीकडे "मॅंगोनेट' प्रणालीकडेही बागायतदारांचा वाढता कल पाहता निर्यातीच्या धोरणाचा अभ्यास करून यावेळी बागायतदार वाशी मार्केटकडे आंबा वळणार असल्याचे चित्र आहे. यासाठी सिंधुदुर्गात परकीय चलन उपलब्ध होऊन जागतिक बाजारपेठेत हापूसची चांगली विक्री व्हावी, यासाठी "मॅंगोनेट' प्रणालीबाबत प्रशिक्षण शिबिर, शेतीशाळा मार्गदर्शन शिबिर याद्वारे जनजागृतीही करत आहेत.

अंदाज बांधणे विक्रेत्यांना कठीण

स्थानिक हापुस विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार हापूसचे बदललेले अर्थकारण व लांबणीवर पडलेला हंगाम पाहता बाजारपेठेत येणाऱ्या दराबाबत मोठी संभ्रमावस्था दिसून येत आहे. दीड ते दोन महिन्यांनी लांबणीवर हंगाम पडल्याने बाजारपेठेत हापूसचा दर काय राहणार ? निर्यातीकडे हापूस किती वाढणार ? याबाबत कुठल्याही प्रकारचा अंदाज बांधणे विक्रेत्यांना कठीण झाले आहे. मान्सूनचे आगमन लवकर झाल्यास मे-जूनमध्ये हाती आलेले पीक वाया जाण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे हापूसची अर्थकारणचा चांगला काळ हा एप्रिल-मेमध्येच असल्याने पहिल्या टप्प्यात येणाऱ्या हापुससाठी बागायतदार मोठी मेहनत घेताना दिसून येणार आहेत हे नक्की. 

मॅंगोनेट प्रणालीचा लाभ बागायतदारांनी घ्यावा
एप्रिलदरम्यान स्थानिक बाजारपेठेत आंबा विक्रीसाठी येणार आहे. स्थानिक बाजारपेठेत ज्या बागायतदारांना समस्या जाणवण्याची शक्‍यता आहे त्यांनी मॅंगोनेट प्रणाली आधारे आपला हापूस परदेशी बाजारपेठेकडे वळवावा. जेणेकरून त्याचा फायदा बागायतदारांना होईल. यासाठी मॅंगोनेट प्रणालीवर जास्तीतजास्त बागायतदारांनी नोंद करून घ्यावी. 
- सी. जी. बागल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्राबाहेरची 'ही' जोडी ठरली भाजपची किंगमेकर...अशाप्रकारे मिळवून दिला महायुतीला बंपर विजय

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT