आगीत दुकान जळून खाक Sakal
कोकण

हर्णे बंदरामध्ये हार्डवेअरे दुकान आगीच्या भक्षस्थानी

आगीत करोडो रूपयांचे नुकसान

सकाल वृत्तसेवा

हर्णे - येथे बंदरामध्ये एका हार्डवेअरच्या दुकानाला आग लागून करोडो रूपयांच नुकसान झाले आहे. यावेळी या घटनेमध्ये वित्तहानी प्रचंड प्रमाणात झाली असून जीवितहानी मात्र टळली आहे. काल रात्री हर्णे बंदरामध्ये १२ वाजण्याच्या सुमारास हर्णे, राजवाडी येथील रहिवाशी महेश मळेकर यांच्या बंदरातील हार्डवेअरच्या दुकानाला अचानक आग लागली. ही घटना प्रथम शेजारी असणाऱ्या रामचंद्र पावसे याना दिसली त्यांनी लगेच आग लागली म्हणून बोंब मारली. लगेचच फत्तेगड, मल्लखांबपेठ, बंदरमोहल्ला, बाजारपेठ येथील सर्व ग्रामस्थ धावून आले.

पावसे यांनी मळेकर याना फोनवरून दुकानालाआग लागल्याचे कळवले. तातडीने राजवाडीतील सर्व ग्रामस्थ घटनास्थळी धावत आले. लगेचच सर्व मच्छीसेंटरचे चालक मालक यांनी घटनास्थळी धाव घेतली. हळूहळू वाऱ्यासारखी बातमी हर्णे पाजपंढरी परिसरात पसरली. तातडीने गावातील बहुसंख्य ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आणि आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. तोपर्यंत अग्नीने रौद्ररूप धारण केले होते. रामचंद्र पावसे यांनी घरातलं सर्व पाणी आग विझवायला खाली केलं. बहुतांशी स्थानिकांनी समुद्र ते आग लागलेलं ठिकाणापर्यंत साखळी मध्ये उभे राहून समुद्राच्या पाण्याचा बादलीच्या साहाय्याने मारा करायला सुरुवात केली. तरीही आग आटोक्यात येत नव्हती. त्याचवेळी फत्तेगडावरील रहिवाशी बंदरात पाणीविक्री करणाऱ्या निलेश दोरकूळकरने आपला पाण्याने भरलेला मोठा ट्रक त्याठिकाणी आणून ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेंव्हा कुठे साधारण दीड वाजेपर्यंत किमान ८०% आग आटोक्यात आली होती. दीडच्या सुमारास दापोली नगरपंचायतीचे नगरसेवक ऋषिकेश गुजर व त्यांची टीम नगरपंचायतीचा पाण्याचा बंब घेऊन दाखल झाले. त्याने अखेर जोराच्या पाण्याच्या प्रवाहाने उरलेली आग पूर्णपणे विझवली. तोपर्यंत दुकानातील १००% समान जळून खाक झालं होतं. दुकानामध्ये बोटीकरिता लागणारे ऑइल, जाळी, ग्रीस, प्लास्टिक पाईप, लोखंडी साहित्य , गोडेतेल, सर्व प्रकारचे धान्य आदी सामान होते. ते सर्व जळून खाक झाल्याने सुमारे दीड कोटींच नुकसान झाले असल्याचे मालक महेश मळेकर यांनी सांगितले.

या आगीमध्ये याच दुकानाला लागूनच एका खलाश्याने आपली दुचाकी उभी केली होती आणि तो नौकेवर मासेमारीसाठी गेला होता. ती त्याची दुचाकी सुद्धा या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे. या दुचाकीचे देखील बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. ही आग कशी लागली त्याचे कारण मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे. याच दुकानाला लागून आणि आजूबाजूला मासेमारी संस्थांचे नौकांना डिझेल पुरवठा करणारे चार टँकर होते. सुदैवाने या चारही टँकरमधील डिझेल संपलेले होते. अन्यथा हर्णे बंदरात मोठं अग्नितांडवच निर्माण झाले असते. घटनास्थळी तातडीने आसूद प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री. मार्कड हे आसूद व आंजर्ले येथील दोन्हीही रुग्णवाहिका घेऊन हजर झाले. संपुर्ण तालुक्याची तसेच नगरपंचायतीची आपत्कालीन व्यवस्था तातडीने घटनास्थळी मदतीकरिता हजर झाली.

गेली १२ ते १५ वर्षांपासून मळेकर यांचा हा उद्योग सुरू होता. बऱ्यापैकी या उद्योगामध्ये मळेकर यांनी आपले पाय रोवले होते. आणि काल अचानक हा भयंकर प्रसंग उदभवला. त्यामुळे मळेकर दाम्पत्य पूर्णपणे खचून गेले आहेत. पुन्हा त्याच उद्योगामध्ये कस उभं रहायचं? आणि झालेलं एवढं करोडो रुपयांचं नुकसान कस भरून काढणार? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहत आहेत.

"२०१० पासून बंदरामध्ये दुकान आहे. गेली दोन वर्षे एकतर कोरोनामुळे धंद्यांची वाट लागली होती आणि आता हे एवढं मोठं संकट कस पेलायच? काल घटना घडल्यावर माझी पत्नी व आई पूर्णपणे खचूनच गेल्या. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवलं त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्याचवेळी याआधी हा एवढा मोठा प्रसंग कधीही न आल्यामुळे मी ही खचून गेलो होतो मलाही हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. एवढं सगळं दीड कोटीच समान जळून खाक झालंय कस उभं राहायचं? अशी घनघोर चिंता लागून राहिली आहे. कारण याच दुकानावर माझा सगळा संसार उभा होता; असे दुकानाचे मालक महेश मळेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT