हर्णे : दापोली तालुक्यातील हर्णे हे एकमेव अस गाव आहे. ज्या गावाला शिवकालीन चार किल्ल्यांचा इतिहास आहे. आणि त्याच गावातील छोट्यामोठ्या मुलांनी दिवाळीच्या निमित्ताने ९ किल्ले सजवले होते. बहुतांशी रोषणाईने सजवलेले किल्ले गावामध्ये एक वेगळंच आकर्षण ठरले होते.
दीपावलीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये शिवरायांनी उभारलेल्या किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याची प्रथाच आहे. त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील हर्णेमध्ये नऊ शिवकालीन किल्ले उभारण्यात आले होते. बहुसंख्य इतिहासप्रेमी या किल्ल्यांना आवर्जून भेट देत होते. यामध्ये बहुतेकांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती बनविली होती. तसेच गुरववाडीतील चिन्मय गुरव याने साताऱ्याचा दातेगड तयार केला होता. या गडाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
यश/चैतन्य चोगले - अजिंक्यतारा (सातारा) (गुरववाडी हर्णे) ; चिन्मय सुधीर गुरव - धर्मवीर संघ (हर्णे गुरववाडी) - दातेगड (पाटण, सातारा) ; मितांश मंदार देवरुखकर - सुवर्णदुर्ग - (सोनारपेठ हर्णे) ; जय भवानी प्रतिष्ठान ( हर्णे जूनी बाजारपेठ) - कोरीगड(सातारा) ; बाजारपेठ हर्णे - सुवर्णदुर्ग (हर्णे) ; रुद्र देवेंद्र दुधम (बाजारपेठ हर्णे) - सुवर्णदुर्ग ; अद्वैत संदेश लखमदे (नाथद्वार नगर) - सुवर्णदुर्ग हर्णे ; वेदांत सचिन मुरुडकर (सुतारवाडी हर्णे) - भुईकोट किल्ला हर्णे ; शौर्य महेश मळेकर - (राजवाडी हर्णे) - पुरंदर किल्ला (पुणे) या शिवकालीन किल्ल्याची उभारणी केली होती . किल्ल्यांच्या या प्रतिकृती साकारताना बारीक गोष्टींना महत्व देण्यात आले आहे होते बुरुजांच्या बांधणीसोबत प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या किल्ल्यावरील वस्तूंचे व वास्तूंचे प्रदर्शन दिसून येत होते.
गावातच मुलांनी ९ किल्ल्यांची उभारणी केल्याने गावात इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभवायला मिळल्याच्या भावना इतिहासप्रेमीं मधून व्यक्त होत होती. कारण तालुकामध्ये अस एकमेव हर्णे गाव आहे की ज्या ठिकाणी शिवरायांच्या आरमरामधील एक जलदुर्ग म्हणजे सुवर्णदुर्ग, दुसरा भुईकोट म्हणजे गोवा किल्ला, तिसरा फत्तेगड, तर चौथा कनक दुर्ग असे चार किल्ले आहेत.
अशा या आरमाराचा सरखेल म्हणून शिवरायांनी कान्होजी आंग्रेंची नेमणूक केली होती असा इतिहास आहे. त्याच गावातील छोट्या मुलांनी व तरुण मंडळी राज्यातील नामवंत किल्ल्यांची उभारणी करून जूणू पुन्हा इतिहास जागविला असल्याचे दिसून आलं. या किल्ल्यांमध्ये चिन्मय गुरव याने सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दातेगडाची हुबेहूब प्रतिकृती उभारताना मंदिर, तलाव , तोफ, रस्ता, बुरुज आणि किल्ल्यावरील अस्तित्व दाखविणाऱ्या अनेक बाबींचा समावेश केल्याने ही कलाकृती लक्षवेधी ठरली होती. तर बाजारपेठ मधील मुलांनी तयार केलेला सुवर्णदुर्ग किल्ला व शौर्य मळेकरने पुरंदर किल्ल्यावर केलेल्या रोषणाईमुळे किल्ला आकर्षक दिसत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.