heavy rain kharepatan sindhudurg district 
कोकण

खारेपाटणला पुन्हा ढगफूटीसदृश पाऊस 

अनिकेत जामसंडेकर

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - खारेपाटण परिसरात आज ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. पावसामुळे परिसरातील नदी-नाल्यांना पाणी आले आहे. हे पाणी लगतच्या शेतांमध्ये घुसल्याने भातशेतीचे तसेच भाजीपाला शेतीवर मातीचा गाळ बसल्याने ती गाडली गेली. 

परिसरात गेले आठवडाभर सातत्याने पाऊस पडत असल्याने यापूर्वी भात शेती व उरलीसुरली शेतीही या ढगफुटी पावसाने गाडली व शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने खरेपाटण परिसरात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे. 

खारेपाटण दशक कृषीतील चिंचवली, तिथवली, दीक्षित, शेरपे गंगावणे नडगिवे वाईंगणी भागात सुमारे पाच तास अक्षरशः ढगफुटीसदृश पाऊस झाला. खारेपाटण व आजूबाजूच्या परिसरात मोठा पाऊस झाल्याने सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हे पाणी शेतामध्ये घुसले. यामुळे शेतीचे भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे खारेपाटण बाजारपेठ जलमय झाली.

पावसाबरोबर वादळी वारे वाहत असल्याने निसर्गाचे रौद्ररूप काळजात धडकी भरणारे होते. बाजारपेठ मुख्य मार्गावर पाणीच पाणी झाल्याने मार्गाला नाल्याचे स्वरूप आले होते. यावेळी दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली; मात्र पावसाचा जोर कायम असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत असून विक्रीसाठी आलेल्या मालाला गिराईक नसल्याने शेतकऱ्यांप्रमाणे व्यापारीही चिंतेत आहे. 

पावसाळा संपणार कधी? 
कोरोनामुळे गेले दहा दिवस व्यापारी पेठ बंद होती. नवरात्र उत्सव दहा दिवसांवर आला असून तरी पाऊस तरी पाऊस थांबत नसल्यामुळे हा पावसाळा संपणार तरी केव्हा असा सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पावसामुळे शूक नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vikramgad Vidhansabha: विक्रमगडमध्ये तिरंगी लढतीत मतांचे विभाजन; कोण मारणार बाजी?

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Mumbai Indians, CSK, RCB सह सर्व संघांचं भविष्य ठरवणारं IPL Mega Auction; जाणून घेऊयात प्रत्येकाची गरज अन् रणनिती

Men's Stylish Outfits : मित्राच्या रिसेप्शनमध्ये आकर्षक आणि स्टायलिश दिसायचं आहे? या पारंपारिक लुकमध्ये चमका

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT