Hightech Bhatji In Konkan Ratnagiri Marathi News  
कोकण

काय सांगता ! कोकणात हायटेक भटजी 

संदेश सप्रे

संगमेश्वर ( रत्नागिरी) - हाताच्या बोटावर चालणाऱ्या वेगवान इंटरनेटच्या जमान्यात आता पौरोहित्यालाही आधुनिकतेचा साज चढला आहे. पोथी पुस्तके हातात घेऊन भिक्षुकी करणारे अनेक भटजीकाका अलीकडे अँड्रॉइड मोबाईलचा वापर करत पूजा सांगताना दिसत आहेत. यात वावगे काहीही नसले तरी जीवनातील प्रत्येक क्षेत्रच मोबाईलने व्यापून टाकल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. 

सोशल मीडियाच्या जमान्यात घर, गाडी, कपडे, जिन्नस अशा गोष्टी आजकाल मोबाईलवरुन बुक केल्या जातात. अलीकडील काळात तर खाणे घरपोच होण्यासाठी मोबाईल इंटरनेटचा वापर वाढला आहे. सोशल मीडियाने जीवनातील बरे-वाईट प्रसंग व्यापून टाकले. गुगल प्ले स्टोअरवर विविध ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला जे हवे ते ऑनलाईन-ऑफलाइन उपलब्ध आहे. मग पौरोहित्य क्षेत्र याला अपवाद कसा ठरेल. कोकणात विशेषत: ग्रामीण भागात आजही पूजा, धार्मिक विधी, उत्तरकार्य विधी असोत सर्वांना तेवढेच महत्त्व असून यासाठी भटजीकाकाच लागतात. हंगामात तर काकांची कमतरता जाणवते. नियमित सरावामुळे बहुतांश भटजीकाकांची स्तोत्र, विधी आदी तोंडपाठ असली तरी गडबडीत काहीही विसरायला झाले तर अडचण नको म्हणून आजकाल सर्रास काका चक्क अँड्रॉइड मोबाईल वापरताना दिसतात. 

पूजा साहित्य ऑफलाइनही उपलब्ध 

ग्रामीण भागात नेटवर्कची सोय नसली तरी काकांची अडचण होत नाही, कारण आजकाल गुगल प्ले स्टोअरवर सर्व प्रकारचे पूजा विधी ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध आहेत. एकदा का जाणकारांकडून ते डाउनलोड करून घेतले की कायमचा प्रश्न मिटतो. त्यामुळे आजकाल गावागावांत लग्न असो वा धार्मिक कार्य, पूजा असो वा होमहवन उपस्थित भटजी काकांनी मोबाईलचा आसरा घेतला तर कुणालाही नवल वाटत नाही. मुंबई-पुण्यासारख्या महानगरामध्ये तर ही पद्धत केव्हाच सुरु झाली आहे. मात्र ग्रामीण भागातही आता हाच पायंडा पडत असल्याने कोकणातील भटजीकाका आता हायटेक होताना दिसत आहेत. 

माबाईल अॅपवर साहित्य उपलब्ध
अनेक ठिकाणी पूजा वा धार्मिक विधीसाठी जाताना पुस्तकांचा विसर पडतो. अशावेळी मोबाईल उपयोगी येतो. बहुतांश पूजा साहित्य मोबाईलवर ऍपमध्ये ऑफलाईन उपलब्ध असल्याने ते आम्हाला फायदेशीर आहे. 
- प्रसाद फाटक, कसबा 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT