Ratnagiri
Ratnagiri  sakal
कोकण

Ratnagiri : ‘हिट अँण्ड रन’प्रकरणी सांगलीतील दोघांना अटक; दाभोळे मार्गावरील अपघातात दोघांचा बळी

सकाळ वृत्तसेवा

लांजा : दाभोळे मार्गावर हिट अँण्ड रनप्रकरणी अखेर एक महिन्यानंतर पसार झालेल्या वाहनचालकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. दोघांचा बळी घेणाऱ्या गुन्ह्याची उकल लांजा पोलिसांना यश आले आहे.

लांजा-आसगे दाभोळे राज्य मार्गावरील ‘हिट अँण्ड रन’च्या घटनेत दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी अखेर एक महिन्यानंतर सांगलीतील वाहन चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. रुपेश सिद्धू वाघमारे (वय ३५, रा. येलापूर, ता. सांगली) याला सांगली येथून अटक केली. लांजा दिवाणी न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्याची उकल करण्यात आली. पोलिसांनी मालवाहतूक ट्रक जप्त केला आहे. २८ एप्रिलला दुपारी आसगे येथे वळणावर दाभोळे येथे जाणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला चिरडले होते.

या घटनेत गोविळ येथील अशोक जाधव आणि प्रकाश जाधव यांचा मृत्यू झाला होता. लांजा कोर्ले फाटा, धुंदरे लाकूड गिरण, आसगे येथील दुकान या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामध्ये दुपारी १ ते ३ दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सांगलीतून रुपेश वाघमारेला अटक केली. अविनाश कागदोळे (रा. सांगली) याच्या मालकीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agriculture State Award: महाराष्ट्राला सर्वश्रेष्ठ कृषी राज्य पुरस्कार जाहीर! CM एकनाथ शिंदे स्वीकारणार ...

Virat Kohli : रोहितला सांगितलं मला काही विश्वास वाटत नाहीये.... पंतप्रधानांशी बोलताना विराटने केला मोठा खुलासा

Team India Prize: महाराष्ट्र शासनाकडून जगज्जेत्या टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस, मुख्यमंत्री शिंदेची मोठी घोषणा

Eknath Shinde: "सुर्याचा कॅच कोणी विसरणार नाही तसंच आम्ही 50 जणांनी..."; CM शिदेंची राजकीय फटकेबाजी

Maharashtra Live News Updates : माविआचा लवकरच मुंबईत संयुक्त मेळावा होणार

SCROLL FOR NEXT